● भारत सरकारची अग्रगण्य प्रकाशन संस्था, ‘प्रकाशन विभागाला’ दिल्लीत सुरू असलेल्या पुस्तक मेळा 2023 मध्ये, रौप्यपदक मिळाले आहे.
● नवी दिल्लीत प्रगती मैदान इथे, या पुस्तक मेळयाच्या समारोप आणि पुरस्कार वितरण समारंभात, प्रकाशन विभागाच्या प्रमुख आणि महासंचालक, अनुपमा भटनागर यांनी प्रकाशन विभाग, इंडिया ट्रेड प्रमोशन ऑर्गनायझेशन (ITPO) आणि फेडरेशन ऑफ इंडियन पब्लिशर्स (FIP) तसेच प्रकाशन विभागाच्या संपूर्ण आयोजक संघाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार स्वीकारला.
● 27 वा दिल्ली पुस्तक मेळा ITPO द्वारे FIP च्या संयुक्त विद्यमाने 29 जुलै ते 2 ऑगस्ट 2023 दरम्यान प्रगती मैदान, नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आला होता.
● प्रकाशन विभागातर्फे प्रकाशित होणारा लोकप्रिय वार्षिक संदर्भग्रंथ, ‘भारत/इंडिया ‘ हे स्टॉलला भेट देणाऱ्यांसाठी मुख्य आकर्षण होते.
● कला आणि संस्कृतीवरील विभागाची भव्य चित्रमय पुस्तके देखील वाचकांच्या पसंतीला उतरली.
● पुस्तकांव्यतिरिक्त, प्रकाशन विभागाच्या ‘योजना’, ‘कुरुक्षेत्र’, ‘आजकल’ आणि ‘बाल भारती’ या लोकप्रिय आणि मोठ्या प्रमाणावर प्रसारित होणाऱ्या नियतकालिकांची देखील वाचकांनी प्रशंसा केली.
● विभागातर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या Employment News /रोजगार समाचार या साप्ताहिकातून सातत्याने रोजगार विषयक अद्ययावत माहिती मिळते याकडेही लक्ष वेधण्यात आले.


