- देशातील पहिल्या संपूर्ण स्वयंचलित ट्रान्शिपमेंट बंदराच्या टर्मिनलचे उद्घाटन केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्या हस्ते झाले.
- केरळ येथील विझिंगम येथे बांधण्यात आलेल्या या मदर पोर्टवर अर्थात मोठ्या बंदरावर मोठ्या जहाजांतील कंटेनर उतरवून घेण्याची आणि ते बदलण्याचे सोय आहे.
- या बंदरावर चीनहून आलेले मालवाहू सॅन फर्नाडो हे जहाज पहिल्यांदा दाखल झाले.
- पाण्याचे फवारे मारून या जहाजाचे स्वागत करण्यात आले. मालवाहू जहाज सॅन फर्नाडो हे
- एक हजारांपेक्षा अधिक कंटेनर घेऊन विहिंजम बंदरावर आले.
- या बंदराची निर्मिती आणि बांधणी अदानी समूहाची कंपनी अदानी पोर्ट्स अॅड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेडकडून करण्यात आली आहे.
- या प्रकल्पावरून केरळ सरकार आणि अदानी पोर्ट्स कंपनी यांच्यात करार झाला आणि त्यानुसार या प्रकल्पाचे काम 5 डिसेंबर 2015 रोजी अदानी पोर्ट्सने सुरू केले.
- या बंदर उभारणीसाठी सुमारे 8,867कोटी रुपयांची गुंतवणूक केली असून यापैकी 5,595 कोटी केरळ सरकारने तर केंद्र सरकारने 818 कोटी रुपयांचा निधी दिला.
- विंझिगम या बंदराची निर्मिती खासगी आणि सार्वजनिक भागीदारीतून करण्यात आली आहे.