● पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने संरक्षण उत्पादनात एक नवा अध्याय लिहिला आहे. 2024-25 या आर्थिक वर्षात देशाचे संरक्षण उत्पादन 1,50,590 कोटी रुपयांवर पोहोचले आहे.
● ही वाढ केवळ आकड्यांपुरती मर्यादित नसून, देशाच्या आत्मनिर्भरतेच्या दिशेने टाकलेले एक मोठे पाऊल आहे. मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत (1.27 लाख कोटी) ही वाढ तब्बल 18 टक्के आहे.
● 2019-20 पासून तर यात 90 टक्क्यांची प्रचंड वाढ झाली आहे, तेव्हा हा आकडा 79,071 कोटी रुपये होता.
● या वाढीव उत्पादनातून भारताचा संरक्षण क्षेत्रातील औद्योगिक पाया अधिक मजबूत होत असून भारताने पहिल्यांदाच संरक्षण उत्पादनात दीड लाख कोटींचा टप्पा पार केला आहे.