भारतात आढळणाऱ्या ‘हिम बिबट्यां’ चा पहिला वैज्ञानिक अहवाल जाहीर झाला असून भारतात सद्यःस्थितीत या प्रजातीचे 718 प्राणी असल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे देशातील निम्म्यापेक्षा जास्त, 477 हिम बिबटे एकट्या लडाख या केंद्रशासित प्रदेशात आढळून आले आहेत. ‘स्नो लेपर्ड पॉप्युलेशन असेसमेंट इन इंडिया प्रोग्राम’ (एसपीएआय) हा अहवाल केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदलमंत्री भूपेंद्र यादव यांनी राष्ट्रीय वन्यजीव मंडळाच्या बैठकीत सादर केला. या अहवालानुसार भारतात 718 हिम बिबटे आढळून आले.
सर्वेक्षणाची वैशिष्ट्ये
• हिम बिबट्यांच्या अधिवासाचा 2019 ते 2023 या काळात अभ्यास
• लडाख खालोखाल उत्तराखंडमध्ये 124, हिमाचल प्रदेशात 51, अरुणाचल प्रदेशात 36, सिक्कीममध्ये 21 व जम्मू काश्मीरमध्ये 9 हिम बिबटे आढळून आले आहेत.
• त्यांची चिन्हे शोधण्यासाठी 13 हजार 450 पायवाटांचे सर्वेक्षण
• 1 हजार 971 ठिकाणी सुमारे 1 लाख 80 हजार कॅमेराट्रॅप
• एकूण 241 ठिकाणी छायाचित्रण