Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

दोन दशकानंतर सांख्यिकी आयोगावर भारताची निवड

  • Home
  • Current Affairs
  • दोन दशकानंतर सांख्यिकी आयोगावर भारताची निवड

संयुक्त राष्ट्रांच्या सांख्यिकी आयोगावर सदस्य म्हणून भारताची निवड झाली आहे . मतदानात भारताला 53 पैकी 46 मते मिळाली . या आयोगावर काम करण्याचे भारताला दोन दशकानंतर संधी मिळाली आहे. याआधी भारत हा 2004 मध्ये सांख्यिकी आयोगाचा शेवटचा सदस्य होता संयुक्त राष्ट्रांच्या आर्थिक आणि सामाजिक परिषदेने सांख्यिकी आयोगावर भारताची निवड केली. आशिया – प्रशांत गटात दक्षिण कोरियाने चीनला पराभूत करत आयोगात स्थान मिळवले. आशियाई- प्रशांत गटातील दोन जागांसाठी भारतासह दक्षिण कोरिया, संयुक्त अरब अमिराती आणि चीन स्पर्धेत होते. पहिल्या टप्प्यातील मतदानात दक्षिण कोरियाला 23 ,चीनला 19 आणि युएईला 15 मते मिळाली. दुसऱ्या टप्प्यात दक्षिण कोरिया आणि चीनला समान 25 मते मिळाली . निवडणुकीच्या नियमानुसार दक्षिण कोरियाला विजयी ठरविण्यात आले.

संयुक्त राष्ट्राचा सांख्यिकी आयोग

युनायटेड नेशन्स स्टॅटिस्टिकल कमिशन हे संयुक्त राष्ट्रांच्या आर्थिक आणि सामाजिक परिषदेचा कार्यात्मक आयोग आहे. सांख्यिकी आयोग संयुक्त राष्ट्रांच्या सांख्यिकी विभागाच्या कामावर देखरेख करतो. सांख्यिकी आयोग ही जागतिक सांख्यिकी प्रणालीची सर्वोच्च संस्था आहे जी जगभरातील सदस्य राष्ट्रातील मुख्य सांख्यिकीशास्त्रज्ञांना एकत्र आणते.

स्थापना : 1947
मुख्यालय : न्यूयॉर्क
अध्यक्ष : शिगेरूरू कवासकी (जपान)
सदस्य संख्या : 24

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *