द्वारकानाथ संझगिरी यांचे निधन
- क्रिकेटचा सामना आपल्या लेखणीने जिवंत करणारे आणि आपल्या मिश्कील शैलीत मुलाखती घेण्यासाठी ओळखले जाणारे ज्येष्ठ क्रिकेट लेखक व संवादक द्वारकानाथ संझगिरी यांचे वयाच्या 74 व्या वर्षी निधन झाले.
- संझगिरी यांनी साप्ताहिक ‘लोकप्रभा’ आणि ‘सांज लोकसत्ता’ साठी लेखन केले होते.
- संझगिरी यांची कर्करोगाविरुद्ध झुंज सुरू असतानाच त्यांचेनिधन झाले.
- मुंबई महानगरपालिकेत अभियंता म्हणून कार्यरत असूनही संझगिरी यांनी आपल्या क्रिकेटप्रेमामुळे वर्तमानपत्रात क्रीडा लेखक म्हणून गेली पाच दशके गाजवली.
- त्यांनी स्तंभलेखक, लेखक आणि सूत्रसंचालक म्हणूनही आपली एक वेगळी ओळख निर्माण केली.
- भारतीय संघाला 1983 आणि 2011 असे दोन एकदिवसीय विश्वचषक उंचावताना पाहणाऱ्या मोजक्याच क्रीडा लेखकांपैकी ते एक होते.
- त्यांनी कसोटी क्रिकेट खेळणाऱ्या जवळपास सर्व देशांचा दौरा, 11 विश्वचषकांचे वार्तांकनही केले.
- संझगिरी यांची 40 पुस्तके प्रकाशित झाली असून ‘भारतरत्न’ सचिन तेंडुलकरवर लिहिलेले पुस्तक विशेष गाजले. त्यांनी चित्रपटांवर आधारित पुस्तकेही लिहिली.
- खेलंदाजी, दशावतार, माझी बाहेरख्याली, चॅम्पियन्स, थेम्सच्या किनाऱ्यावरून, शतकांत एकच सचिन, क्रिकेट कॉकटेल, फिरता फिरता अशा पुस्तकांना वाचकांची मोठी पसंती लाभली.