राज्यसेवा परीक्षा स्वरुप
सद्याचे युग हे ‘स्पर्धेचे युग’ आहे. स्पर्धा परिक्षेला बसणे हा प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्वाचा निर्णय असतो.
निर्णय घेतल्यानंतर मात्र आपण लगेच अभ्यासाला सुरुवात करतो आणि अपयश आल्यानंतर मग त्याची कारणे शोधायला लागतो. जर आपल्याला पहिल्याच प्रयत्नात (First Attempt) यश मिळवायचे असेल तर MPSC परिक्षेच्या अभ्यासाला सुरुवात करण्यापूर्वी पुढील बाबी लक्षात घेणे महत्त्वाचे आहे.
- सर्वप्रथम राज्यसेवेचे स्वरुप / संरचना समजून घ्या.
- नंतर अभ्यासाला सुरुवात करण्यापूर्वी सर्वप्रथम परिक्षेच्या अभ्यासक्रमाचे (Syllabus) विश्लेषण करा.
- सर्वप्रथम मुख्य परीक्षेची तयारी करा, त्यासाठी मागच्या कमीत कमी दहा वर्षाच्या प्रश्नपत्रिका (MPSC(old), UPSC PYQ) पहा.
- मुख्य परिक्षेची तयारी झाल्यानंतरच मग पूर्व परिक्षेची तयारी सुरु करा.
- अभ्यासाला सुरुवात करताना संदर्भ पुस्तके (Reference Books) चांगल्या दर्जाची निवडावीत.
सदर लेखामध्ये आपण राज्यसेवेचे स्वरुप / संरचना कशी आहे ते समजून घेणार आहोत.
राज्यसेवा परीक्षा
सर्वसाधारणपणे राज्यसेवा परीक्षेमध्ये एकूण तीन टप्पे असतात:
- राज्यसेवा पूर्व परीक्षा – 400 गुण
- राज्यसेवा मुख्य परीक्षा – 1750 गुण
- मुलाखत व व्यक्तिमत्त्व तपासणी – 275 गुण
वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाच्या प्रश्नांसाठी नकारात्मक गुणांकन असून प्रत्येक चुकीच्या उत्तरामागे 1/4 (25%) इतके गुण वजा केले जातात.
राज्यसेवा (पूर्व) परीक्षा (MPSC Preliminary)
पूर्व परीक्षा ही मुख्य परीक्षेसाठी चाळणी परीक्षा असते. तिचे गुण अंतिम निवड प्रक्रियेत विचारात घेतले जात नाहीत.
पूर्व परीक्षा दोन पेपरांची असते – एकूण 400 गुण
- पेपर 1: सामान्य अध्ययन (200 गुण)
- पेपर 2: CSAT (200 गुण) – अर्हताकारी (Qualifying) – किमान 33% आवश्यक
पेपर 1: सामान्य अध्ययन (General Studies)
- राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय चालू घडामोडी
- इतिहास व राष्ट्रीय चळवळ
- भूगोल – महाराष्ट्र, भारत व जग
- राज्यशास्त्र व प्रशासन
- आर्थिक व सामाजिक विकास
- सामान्य विज्ञान
- पर्यावरण, जैव विविधता व हवामान बदल
पेपर 2: CSAT
- आकलन
- संवाद व आंतरवैयक्तिक कौशल्य
- तर्कशुद्ध व विश्लेषणात्मक क्षमता
- निर्णय क्षमता व समस्या सोडविणे
- मानसिक क्षमता
- अंकगणित व विदा विश्लेषण
- मराठी व इंग्रजी आकलन (10वी / 12वी स्तर)
राज्यसेवा मुख्य परीक्षा (MPSC Mains)
मुख्य परीक्षा ही लेखी स्वरुपाची असून एकूण 1750 गुणांची आहे. त्यामध्ये 9 पेपर्स असतात:
- पेपर 1: मराठी (300 गुण) – अर्हताकारी
- पेपर 2: इंग्रजी (300 गुण) – अर्हताकारी
- पेपर 3: निबंध लेखन (250 गुण)
- पेपर 4: सामान्य अध्ययन – 1 (250 गुण)
- पेपर 5: सामान्य अध्ययन – 2 (250 गुण)
- पेपर 6: सामान्य अध्ययन – 3 (250 गुण)
- पेपर 7: सामान्य अध्ययन – 4 (250 गुण)
- पेपर 8: वैकल्पिक विषय – पेपर 1 (250 गुण)
- पेपर 9: वैकल्पिक विषय – पेपर 2 (250 गुण)
मुख्य पेपरांचे तपशील
- पेपर 1 व 2: भाषा चाचणी – अर्हताकारी (25% गुण आवश्यक)
- पेपर 3: निबंध लेखन – बहुविध विषयांवर सुसंगत, संक्षिप्त मांडणी
- पेपर 4: इतिहास, संस्कृती, जागतिक भूगोल
- पेपर 5: राज्यशास्त्र, संविधान, आंतरराष्ट्रीय संबंध
- पेपर 6: तंत्रज्ञान, पर्यावरण, जैवविविधता, आपत्ती व्यवस्थापन
- पेपर 7: नीतिशास्त्र, सचोटी, योग्यता – केस स्टडीसह
- पेपर 8 व 9: वैकल्पिक विषय – एक विषय निवडून दोन पेपर
प्रत्येक पेपरसाठी उत्तर मराठी किंवा इंग्रजीमध्ये देता येते (केवळ इंग्रजी असलेले विषय वगळून).
निष्कर्ष
राज्यसेवा परीक्षा ही तीन टप्प्यांची आणि विस्तृत अभ्यासक्रमाची असते. योग्य नियोजन, दर्जेदार स्रोत आणि सातत्यपूर्ण सराव यामुळे तुम्ही पहिल्याच प्रयत्नात यश मिळवू शकता.