- देशात 18 व्या लोकसभेसाठी 19 एप्रिल ते 1 जून या कालावधीत 7 टप्प्यांमध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीने 293 जागांवर विजय मिळवत बहुमत प्राप्त केले.
- आधीच्या दोन निवडणुकांप्रमाणे भाजपला एकहाती बहुमत मिळाले नसले तरी 240 जागा जिंकत हा पक्ष सर्वांत मोठा पक्ष ठरला.
- मित्रपक्षांच्या साह्याने भाजपने बहुमताचा दावा करत 9 जून रोजी सरकार स्थापन केले.
- एकूण 31 नेत्यांना कॅबिनेट मंत्रिपद, 5 जणांना स्वतंत्र कार्यभार आणि 36 नेत्यांना राज्यमंत्रिपद देण्यात आले. एकूण 72 जणांचा यात समावेश आहे.
पंडित नेहरू नंतर सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणारे मोदी दुसरे पंतप्रधान
- नरेंद्र मोदी यांनी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेत इतिहास घडविला.
- पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर सलग तिसऱ्यांदा या पदाची शपथ घेणारे ते दुसरे आणि काँग्रेसेतर पहिलेच नेते ठरले आहेत.
- मोदींशिवाय राजनाथसिंह, अमित शहा, नितीन गडकरी यांच्यासह एकूण 71 जणांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेतली.
- राष्ट्रपती भवनाच्या आवारात झालेल्या या भव्य समारोहाला 9 देशांचे प्रमुख, विविध देशांचे राजनैतिक अधिकारी, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह विविध पक्षांचे नेते, उद्योगपती, चित्रपट क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्ती उपस्थित होते.
सात महिलांना संधी
- निर्मला सीतारामन, शोभा करंदलजे, अपना दलाच्या अनुप्रिया पटेल या अनुभवी महिला नेत्यांबरोबरच रक्षा खडसे (महाराष्ट्र), सावित्री ठाकूर (मध्य प्रदेश), अन्नपूर्णा देवी (झारखंड) आणि निमूबेन बांभणिया (गुजरात) यांना प्रथमच मंत्रिमंडळात स्थान मिळाले आहे.
महाराष्ट्रातील सहा जणांना संधी
- केंद्रीय मंत्रिमंडळात महाराष्ट्रातील सहा नेत्यांना संधी मिळाली आहे.
- यामध्ये नितीन गडकरी, पीयूष गोयल या दोन्ही भाजप नेत्यांना पूर्वीप्रमाणेच कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आले आहे.
- तर रामदास आठवले (रिपब्लिकन पार्टी-आठवले गट), प्रतापराव जाधव (शिवसेना), रक्षा खडसे (भाजप) आणि यंदा प्रथमच निवडून आलेले पुण्यातील भाजपचे नेते मुरलीधर मोहोळ यांना राज्यमंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
नायडू, रक्षा खडसे तरुण मंत्री
- ‘मोदी0’ मंत्रिमंडळामध्ये अनेक नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. के. राम मोहन नायडू (वय 36) हे या मंत्रिमंडळातील सर्वांत तरुण मंत्री ठरले आहेत.
- तर महाराष्ट्रातील रक्षा खडसे (वय 37) या दुसऱ्या क्रमांकाच्या तरुण मंत्री ठरल्या आहेत.
- रक्षा खडसे या 26 व्या वर्षी पहिल्यांदा लोकसभेच्या सदस्य झाल्या होत्या.
- लागोपाठ तिसऱ्यांदा त्या खासदार झाल्या आहेत.