विषाणू युध्द अभ्यास
- साथरोगांचेनियंत्रण करण्यासाठीच्या सज्जतेचे मूल्यांकन करण्याच्या उद्देशाने राजस्थानच्या अजमेर जिल्ह्यात 27 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट 2024 या कालावधीत राष्ट्रीय वन हेल्थ अभियानाअंतर्गत (एनओएचएम) “विषाणू युद्ध अभ्यास” (विषाणूविरुद्धच्या लढ्याचा सराव) हे मॉक ड्रील घेण्यात आले.
- मानवीआरोग्य, पशुपालन तसेच वन्यजीवसंबंधी क्षेत्रातील तज्ञांचा समावेश असलेल्या राष्ट्रीय संयुक्त साथरोग प्रतिसाद पथकाची सज्जता आणि प्रतिसादात्मक कार्य यांचे मूल्यांकन करण्यासाठी ही सराव चाचणी घेण्यात आली.
- यासाठीवास्तव जगातील साथरोगाच्या फैलावाची कल्पना करण्यासाठी पशुजन्य आजाराच्या साथीचा फैलाव झाल्याचे दृश्य उभे करण्यात आले.
- देशातप्रथमच करण्यात आलेल्या अशा प्रकारच्या या सराव चाचणी उपक्रमाचे केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जे.पी.नड्डा यांनी कौतुक केले आहे.
- राष्ट्रीयरोग नियंत्रण केंद्र (एनसीडीसी), भारतीय वैद्यकीय संशोधन मंडळ (आयसीएमआर), आरोग्य सेवा महासंचालनालय (डीजीएचएस), केंद्रीय पशुपालन आणि दुग्धविकास विभाग तसेच सामाजिक आरोग्य केंद्र यांतील डॉक्टर्स आणि कर्मचारीवर्ग या सराव चाचणीमध्ये सहभागी झाला होता.
- हीसराव चाचणी पुढील दोन महत्त्वाच्या घटकांवर आधारित होती :
अ) नकली साथीच्या प्रसारासाठी जबाबदार असलेल्या विषाणूच्या अस्तित्वासाठी तपासणी तसेच निश्चित निदान आणि
ब) माणसांमध्ये तसेच प्राण्यांमध्ये या आजाराच्या प्रसारावर नियंत्रण ठेवण्यासाठी केलेली कार्यवाही.
- यासंदर्भातीलप्रतिसादाचे स्वतंत्र निरीक्षकांकडून निरीक्षण करण्यात आले. एनजेओआरटीच्या निर्देशांनुसार जिल्हा आणि राज्य आरोग्य पथकांनी दिलेला प्रतिसाद बहुतांश वेळा त्वरित आणि सुयोग्य होता असे आढळून आले. या सरावानंतर आणखी सुधारणा आवश्यक असलेली क्षेत्रे देखील निश्चित करण्यात आली.
- विषाणूयुध्द अभ्यास हा सराव एक यशस्वी उपक्रम म्हणून सिध्द झाला असून त्याद्वारे पशुजन्य आजारांच्या साथींप्रती भारताची सज्जता तसेच प्रतिसाद यांच्यात सुधारणा करण्याच्या दृष्टीने भविष्यातील धोरणे आखण्यासाठी सर्व संबंधित क्षेत्रांदरम्यान समन्वयीत आणि कार्यक्षम दृष्टीकोन जोपासण्याबाबत मौलिक विचारधन प्राप्त झाले.
मराठी विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ. अविनाश आवलगावकर
- अमरावतीजिल्ह्यातील रिद्धपूर येथील मराठी भाषा विद्यापीठाचे पहिले कुलगुरू, कुलसचिवांची निवड करण्यात आली आहे.
- त्यातडॉ. अविनाश आवलगावकर यांची पहिले कुलगुरू म्हणून निवड करण्यात आली.
- एकवर्षाच्या कालावधीसाठी किंवा कुलपतींद्वारे कुलगुरूंची नियमित नियुक्ती होईपर्यंत जे आधी होईल तोपर्यंत डॉ. आवलगावकर यांची नियुक्ती राहणार आहे.
- उच्चव तंत्रशिक्षण विभागाने या बाबतचा शासन आदेश प्रसिद्ध केला.
- मराठीभाषेचे विद्यापीठ स्थापन करण्याची अनेक वर्षांपासूनची मागणी होती. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रिद्धपूर येथे मराठी भाषेचे विद्यापीठ उभारण्याची घोषणा केली होती.
- विद्यापीठाच्यास्थापनेसंदर्भात साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांच्या अध्यक्षतेखाली सहा सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली होती.
- यापार्श्वभूमीवर आता पहिले कुलगुरू म्हणून डॉ. अविनाश आवलगावकर यांची निवड करण्यात आली आहे.
- डॉ. आवलगावकरहे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागाचे माजी प्रमुख आहेत. त्यांनी अनेक पुस्तकांचे लेखन केले आहे.
- विद्यापीठाचेपहिले कुलसचिव म्हणून उच्च शिक्षण विभागाच्या अमरावती विभागाचे सहसंचालक यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
अपराजिता महिला आणि बाल विधेयक 2024
- पश्चिमबंगालमध्ये नव्या विधेयकानुसार बलात्कार प्रकरणाचा तपास 21 दिवसांतच पूर्ण करणे बंधनकारक असून पीडित मुलगी अत्यवस्थ झाल्यास किंवा तिचा मृत्यू झाल्यास दोषींना दहा दिवसात फाशीची शिक्षा दिली जाणार आहे.
- पश्चिमबंगाल विधिमंडळाचे दोन दिवस विशेष अधिवेशन बोलविण्यात आले आहे .
- यानुसारविधानसभेत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या उपस्थितीत कायदामंत्री मोलो घातक यांनी मांडलेल्या विधेयकाला अपराजिता महिला आणि बाल विधेयक 2024 (पश्चिम बंगाल गुन्हे कायदा आणि दुरुस्ती) असे नाव दिले आहे.
विधेयकातील महत्त्वाच्या तरतुदी:
- पश्चिमबंगालच्या फौजदारी कायदा व दुरुस्ती विधेयकाच्या माध्यमातून बलात्कार व लैंगिक शोषणाच्या घटनांपासून महिला आणि मुलींचे संरक्षण करणे.
- बलात्कारादरम्यानपीडितेचा मृत्यू झाल्यास किंवा अत्यवस्थ झाल्यास अशा स्थितीत दोषीला फाशीची शिक्षेची तरतूद
- 16 पेक्षाकमी वयोगटातील मुलीवर अत्याचार करणाऱ्यास किमान 20 वर्षांची शिक्षा किंवा जन्मठेप आणि दंड
- 12 पेक्षाकमी वयोगटातील मुलीवर अत्याचर करणाऱ्यास किमान 20 वर्षाची शिक्षा, जन्मठेप आणि दंड किंवा मृत्युदंड
- 18 पेक्षाकमी वयोगटातील मुलीवर अत्याचार करणाऱ्यास जन्मठेप, दंड किंवा मृत्युदंड
- सामूहिकबलात्कारातील नराधमांना जन्मठेपेची शिक्षा आणि त्यांना संपूर्ण आयुष्य तुरुंगातच काढावे लागेल. त्यांना पॅरोल रजेची सोय नसेल.
- विधेयकाच्यामसुद्यात भारतीय न्याय संहितेच्या सेक्शन ६४,६६,७०(१), ७१,७२ (१), ७३, १२४ (२) यामध्ये बदलाचा प्रस्ताव आहे. प्रामुख्याने बलात्काऱ्याला शिक्षा, बलात्कार आणि हत्या, सामूहिक बलात्कार, सतत गुन्हे करणे, पीडितेची ओळख सांगणे, अॅसिड हल्ला यासारख्या गुन्ह्यांचा समावेश.
- नव्याविधेयकानुसार, बलात्कार प्रकरणाचा तपास 21 दिवसांत पूर्ण करणे आणि प्रसंगी या तपासाला 15 दिवसांची मुदतवाढ देता येऊ शकेल. परंतु ही मुदतवाढ पोलिस अधीक्षक यांच्या समकक्ष असणारे अधिकारी देऊ शकतील. तत्पूर्वी त्यांना लेखी स्वरूपात याबाबतचे कारण केस डायरीत द्यावे लागेल.
- सराईतगुन्हेगारांना आजन्म शिक्षेची तरतूद केली आहे. यात दोषीला जिवंत असेपर्यंत तुरुंगातच राहावे लागेल. तसेच दंडही आकारला जाईल.
- विधेयकानुसारतपासासाठी विशेष कृती दल तयार करण्याचा प्रस्ताव आहे. त्यास अपराजिता टास्क फोर्स असे नाव असेल. त्याचे नेतृत्व पोलिस अधीक्षक करतील. त्यांच्यावर नव्या तरतुदींनुसार तपासाची जबाबदारी असेल.
- पीडितांनालवकर न्याय मिळण्यासाठी विशेष न्यायालय आणि विशेष तपास पथक नियुक्त करण्याचा प्रस्ताव आहे.
- माध्यमांसाठीनवा नियम केला असून न्यायालयीन कामकाजाचे वार्तांकन प्रसिद्ध करताना परवानगी घ्यावी लागेल. नियमांचे पालन न केल्यास दंडांसह तीन ते पाच वर्षांच्या शिक्षेची तरतूद
नरेंद्र मोदी ब्रुनेई दौऱ्यावर
- पंतप्रधाननरेंद्र मोदी सध्या ब्रुनेईच्या दौऱ्यावर आहेत.
- याआग्नेय आशियाई देशाला भेट देणारे ते पहिले भारतीय पंतप्रधान आहेत.
- ब्रुनोईचेसुलतान हसनल बोल्कीया यांच्या निमंत्रणावरून मोदी म ब्रुनेईला पोहोचले आहेत.
- ब्रिटनचीराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्यानंतर सर्वांत जास्त काळ राज्य करणारे जगातील ते दुसरे राजे आहेत.
शीतल– राकेशला कांस्य
- एकेरीतपदकाने हुलकावणी दिल्यानंतर पायाने लक्ष्यभेद करणाऱ्या शीतल देवीने राकेश कुमारच्या साथीने खेळताना पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये तिरंदाजीच्या कम्पाऊंड प्रकारातील मिश्र सांघिक गटात कांस्यपदकाची कमाई केली.
- संघर्षपूर्णलढतीत शीतल-राकेश जोडीने इटलीच्या एलोनोरा सार्टी- मॅट्टओ बोनासिना जोडीचा १५६-१५५ असा अवघ्या एका गुणाच्या फरकाने पराभव केला. पॅरालिम्पिकमधील तिरंदाजीत भारताला मिळालेले हे दुसरेच पदक आहे.
- यापूर्वीटोकियो स्पर्धेत हरविंदर सिंगने वैयक्तिक कांस्यपदक मिळवले होते.
दीप्तीला कांस्यपदक
- भारताच्यादीप्ती जीवानजी ने पॅरिस पॅरालिंपिकमधील महिलांच्या ४०० मीटर शर्यतीत (टी- २०) कांस्य पदकावर नाव कोरले.
- तिने५५.८२ सेकंदात ही शर्यत पूर्ण करत भारतासाठी १६वे पदक पटकावले.
- दीप्तीहिचे पॅरालिंपिकमधील हे पहिलेच पदक ठरले.
- याआधीतिने जागतिक व आशियाई पॅरा स्पर्धेत पदक पटकावले होते.
- भारताचेया वर्षाच्या पॅरालिंपिकमधील अॅथलेटिक्सतील हे सहावे पदक ठरले