पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे काशी तमिळ संगमम् 2023 चे उद्घाटन केले. पंतप्रधानांनी या कार्यक्रमात कन्याकुमारी – वाराणसी तमिळ संगमम् रेल्वेला हिरवा झेंडा दाखवला तसेच थिरुक्कुरल, मनिमेकलाई आणि इतर उत्कृष्ट तमिळ साहित्याचे विविध भाषेतील तसेच ब्रेल लिपीतील अनुवादाचे लोकार्पणही केले.
काशी तमिळ संगमम् चे उद्दिष्ट
• देशातील दोन सर्वात महत्त्वाची आणि शिक्षणाची प्राचीन ठिकाणे असलेल्या तामिळनाडू आणि काशी यांच्यातील जुने दुवे पुन्हा शोधणे, त्या दुव्यांची पुष्टी करणे आणि त्यांचा उत्सव साजरा करणे हे काशी तमिळ संगमम् चे उद्दिष्ट आहे.
• पंतप्रधानांनी सर्वांचे पाहुणे म्हणून नव्हे तर आपले कुटुंबीय म्हणून स्वागत केले.
• तामिळनाडूतून काशीला येणे म्हणजे भगवान महादेवाच्या मदुराई मीनाक्षी या एका निवासापासून काशी विशालाक्षी या दुसऱ्या निवासस्थानापर्यंत प्रवास करणे होय, हे पंतप्रधानांनी अधोरेखित केले.
• पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या भाषणाचे तमिळमध्ये भाषांतर करण्यासाठी प्रथमच कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरावर प्रकाश टाकला आणि भविष्यातील कार्यक्रमांमध्येही त्याचा वापर केला जाईल असे सांगितले.
• याप्रसंगी पंतप्रधानांनी कन्याकुमारी – वाराणसी तमिळ संगमम् रेल्वेला हिरवा झेंडा दाखवला तसेच तिरुक्कुरल, मनिमेकलाई आणि इतर उत्कृष्ट तमिळ साहित्याच्या विविध भाषेतील आणि ब्रेल लिपीतील अनुवादाचे लोकार्पण केले.