Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

नरेंद्र मोदी यांना ‘द ऑर्डर ऑफ मुबारक अल – कबीर’ सर्वोच्च पुरस्कार प्रदान

नरेंद्र मोदी यांना 'द ऑर्डर ऑफ मुबारक अल - कबीर' सर्वोच्च पुरस्कार प्रदान

राष्ट्रीय शेतकरी दिन

  • राष्ट्रीय शेतकरी दिन, हाकिसान दिवसम्हणूनही ओळखला जातो, हा दिवस शेतकऱ्यांच्या अथक परिश्रमांचा आणि त्यांच्या अमूल्य योगदानांचा सन्मान करण्यासाठी समर्पित आहे
  • प्रत्येक वर्षी 23 डिसेंबर रोजी हा दिवस साजरा केला जातो, जो भारताचे पाचवे पंतप्रधान चौधरी चरण सिंग यांच्या जयंतीला साजरा होतो
  • शेतकऱ्यांना समर्पित असलेला हा दिवस त्यांचे महत्त्व आणि शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांची दखल घेतो.
  • चौधरी चरण सिंग हे शेतकऱ्यांच्या हक्कांचे रक्षक आणि कृषी क्षेत्रातील सुधारणा करण्यासाठी ज्ञात होते. त्यांच्या शेतकऱ्यांसाठी केलेल्या योगदानामुळे हा दिवस साजरा केला जातो.
  • थीम: “शाश्वत अन्न सुरक्षा आणि लवचिकतेसाठी स्मार्ट सोल्यूशन्स वितरित करणे,” 

नरेंद्र मोदी यांना ऑर्डर ऑफ मुबारक अलकबीर‘  सर्वोच्च पुरस्कार प्रदान

  • भारत आणि कुवेतदरम्यानचे संबंध अधिक बळकट करण्यात महत्त्वाची भूमिका बजावल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कुवेतचा ऑर्डर ऑफ मुबारक अलकबीरहा सर्वोच्च पुरस्कार प्रदान करण्यात आला.
  • बायन पॅलेस येथे अमिर शेख मेशल अलअहमद अलजेबर अलसबाह यांनी मोदींना हा पुरस्कार दिला.
  • हा सन्मान आपण भारतीयांना आणि भारतकुवेत मैत्रीला अर्पण करत असल्याचे पंतप्रधान मोदींनी जाहीर केले.
  • ऑर्डर ऑफ मुबारक अल कबीर हा कुवैती नाईटहूड आहे जो देशाचे प्रमुख, परदेशी सार्वभौम आणि परदेशी राजघराण्यातील सदस्यांना मैत्रीचे प्रतीक म्हणून दिला जातो.
  • मोदी यांना एखाद्या राष्ट्राकडून मिळालेला हा 20 वा पुरस्कार आहे
  • ऑर्डर ऑफ मुबारक अल कबीरयाआधी बिल क्लिंटन, प्रिन्स चार्ल्स आणि जॉर्ज बुश यांसारख्या परदेशी नेत्यांना देण्यात आला आहे.

भारतकुवेत संबंध

  • कुवेत भारताचा आघाडीचा व्यापारी भागीदार देश
  • 2023-24मध्ये द्विपक्षीय व्यापार 10.47अब्ज डॉलर
  • कुवेत भारताचा सहाव्या क्रमांकाचा कच्चे तेल पुरवठादार देश
  • भारताची कुवेतला निर्यात 2 अब्ज डॉलरपर्यंत पोहोचली
  • भारतातील कुवेतची गुंतवणूक 10 अब्ज डॉलर
  • नरेंद्र मोदी कुवेत देशाला भेट देणारे मोदी हे मागील 43 वर्षांतील पहिलेच भारतीय पंतप्रधान आहेत. यापूर्वी इंदिरा गांधी यांनी 1981 मध्ये या देशाला भेट दिली होती.

19 वर्षाखालील महिला आशिया क्रिकेट स्पर्धा (20-20) 

  • 19 वर्षाखालील(20-20) आशिया चषक स्पर्धेत भारतीय महिला संघाने अंतिम   सामन्यात बांगलादेशचा पराभव केला.
  • भारतीय संघाने अंतिम सामन्यात 41 धावांनी विजय मिळवला
  • आशिया चषकाचा अंतिम सामना मलेशियातील क्वालालंपूर येथे झाला.

वनक्षेत्राच्या वाढीत छत्तीसगड देशात पहिल्या स्थानावर

  • छत्तीसगडमध्ये मागील दोन वर्षांत वनांची आणि झाडांची संख्या देशातील इतर राज्यांच्या तुलनेत सर्वाधिक वाढल्याची माहिती नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या भारतीय वनसर्वेक्षण अहवाल 2023 मध्ये (आयएसएफआर) देण्यात आली आहे.
  • छत्तीसगड खालोखाल अनुक्रमे उत्तर प्रदेश, ओडिशा आणि राजस्थान या राज्यांत वनांची संख्या सर्वाधिक असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले
  • पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांच्या हस्ते वन संशोधन संस्था, डेहराडून येथे हा अहवाल प्रकाशित करण्यात आला
  • भारतीय वन सर्वेक्षणाच्या माध्यमातून (एफएसआय) 1987 पासून दर दोन वर्षांनी हा अहवाल प्रसिद्ध करण्यात येतो. रिमोट सेन्सिंग, उपग्रहाच्या माध्यमातून उपलब्ध झालेली माहिती आणि प्रत्यक्ष  सर्वेक्षणाच्या आधारे हा अहवाल तयार करण्यात येतो.
  • यामध्ये देशातील जंगले आणि वनसंपदेचे सखोल मूल्यांकन करण्यात येते
  • या अहवालात वनक्षेत्रे, वृक्षाच्छादित प्रदेश, खारफुटीची जंगले, देशामधील जंगलातील कार्बन साठा, वणवे, कृषी वनीकरण इत्यादींची विस्तृत माहिती देण्यात आलेली आहे.
  • सध्याच्या मूल्यांकनानुसार, देशात सध्या 8 लाख 27 हजार 357 चौरस किलोमीटर वन आणि वृक्षाच्छादित क्षेत्र आहे, जे देशाच्या भौगोलिक क्षेत्राच्या 25.17 टक्के आहे.
  • वनक्षेत्राचे क्षेत्रफळ सुमारे 7 लाख 15 हजार 343 चौरस किलोमीटर (21.76%) आहे तर वृक्षाच्छादनाचे क्षेत्रफळ 1 लाख 12 हजार 14 चौरस किलोमीटर (3.41%) एवढे आहे.

वनक्षेत्र आणि वृक्षाच्छादित क्षेत्रात सर्वाधिक वाढ झालेली राज्ये

  • 684 चौ. कि.मी. छत्तीसगड 
  • 559 चौ. कि.मी. उत्तर प्रदेश
  • 559 वर्ग कि.मी. ओडिशा
  • 394 चौ. कि.मी. राजस्थान

वनक्षेत्रात सर्वाधिक वाढ झालेली राज्ये

  • 242 चौ. कि.मी. मिझोराम 
  • 180 चौ. कि.मी. गुजरात
  • 152 चौ. कि.मी. ओडिशा

अहवालातील प्रमुख निष्कर्ष

  • क्षेत्रफळानुसार सर्वांत मोठी जंगले आणि वृक्षाच्छादित प्रदेश असलेल्या तीन राज्यांमध्ये मध्य प्रदेश 85 हजार 724 चौ. कि.मी. त्याखालोखाल अरुणाचल प्रदेश 67 हजार 83 चौ. कि.मी. आणि महाराष्ट्र 65 हजार 383 चौ. कि.मी.
  • क्षेत्रफळानुसार सर्वांत मोठी वनक्षेत्रे असलेली तीन राज्ये मध्य प्रदेश 77 हजार 73चौ. कि.मी. त्याखालोखाल अरुणाचल प्रदेश 65 हजार 882 चौ. कि.मी. आणि छत्तीसगड 55 हजार 812 चौ. कि.मी.
  • 19 राज्ये केंद्रशासित प्रदेशांमध्ये 33 टक्क्यांहून अधिक भौगोलिक क्षेत्र वनांच्या आच्छादनाखाली आहे. यापैकी मिझोराम, लक्षद्वीप, आंदमान निकोबार, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मेघालय, त्रिपुरा मणिपूर येथे 75 टक्क्यांपेक्षा जास्त जंगले
  • या वर्षीच्या मूल्यांकनात देशातील जंगलात एकूण कार्बन साठा 7, 285.5 दशलक्ष टन असल्याचा अंदाज आहे.
  • गेल्या मूल्यांकनाच्या तुलनेत कार्बन साठ्यात 81.5 दशलक्ष टनांची वाढ

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *