● पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या नामीबियाच्या अधिकृत दौऱ्यावर आहेत. नामीबियाच्या राष्ट्राध्यक्षा नेटुम्बो नंदी-नदैतवा यांच्या हस्ते पंतप्रधानांना नामीबियाचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘ऑर्डर ऑफ द मोस्ट एन्शंट वेल्विट्सचिया मिराबिलिस’ प्रदान करण्यात आला.
● हा सन्मान मिळविणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पहिले भारतीय नेते ठरले आहेत.
● पंतप्रधानांनी हा सन्मान स्वीकारताना तो भारतातील 1.4 अब्ज जनतेचा आणि भारत-नामिबिया यांच्यातील ऐतिहासिक आणि दृढ संबंधांचा सन्मान असल्याचे सांगितले.
● राष्ट्राध्यक्ष नंदी-नदैतवा आणि नामिबियाच्या जनतेचे त्यांनी मन:पूर्वक आभार मानले.
● पंतप्रधानांना मिळालेला हा सन्मान भारत आणि नामिबिया यांच्यातील द्विपक्षीय संबंधांतील एक महत्त्वाचा टप्पा आहे.
● दोन्ही देशांतील युवा पिढ्यांसाठी ही एक प्रेरणादायक घटना ठरेल आणि द्विपक्षीय विशेष भागीदारीला अधिक उंचीवर घेऊन जाईल.
महत्त्वाचे करार आणि घोषणा :
● नामिबियामध्ये उद्योजकता विकास केंद्र स्थापन करण्याबाबतचा सामंजस्य करार
● आरोग्य आणि औषध क्षेत्रात सहकार्य करण्याबाबतचा सामंजस्य करार
महत्त्वाच्या घोषणा:
● नामिबियाने आपत्कालीन परिस्थितीत टिकाव धरू शकणार्या – शाश्वत पायाभूत सुविधांविषयक आघाडीत सामील होण्याबद्दलचे स्वीकृती पत्र सादर केले.
● नामिबियाने जागतिक जैवइंधन आघाडीत (Global Biofuels Alliance) सामील होण्याबद्दलचे स्वीकृती पत्र सादर केले.
● नामिबिया हा यूपीआय तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यासाठी परवाना कराराचा स्वीकार करणारा जागतिक स्तरावरचा पहिला देश ठरला आहे.