महाराष्ट्र राज्य शालेय शिक्षण विभागाने पायाभूत स्तर, शालेय शिक्षण, शिक्षक आणि प्रौढ शिक्षणात धोरणाच्या गुणवत्तापूर्ण अंमलबजावणीसाठी 24 मे 2023 रोजी राज्यस्तरीय सुकाणू समिती स्थापन केली.
शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन करण्यात आली. या समितीत प्रधान सचिव हे सहअध्यक्ष तर शिक्षण आयुक्त हे उपाध्यक्ष असणार आहेत. यामध्ये शिक्षणतज्ञ, अभ्यासक असे 28 जण सदस्य आणि एक सदस्य समितीत असणार आहेत.
राज्य अभ्यासक्रम आराखड्यात शिफारशी, मार्गदर्शन तसेच 5+3+3+4 या रचनेतील शैक्षणिक कार्याचे सनियंत्रण आणि सुसूत्रीकरण करण्यासाठी ही सुकाणू समिती स्थापन केली आहे.
या सुकाणू समितीचा कार्यकाळ हा प्रत्येक टप्प्यावरील किमान सुरवातीची मूल्यमापन प्रक्रिया पूर्ण होऊन त्यास शासन मंजुरी मिळेपर्यंत राहणार आहे.
अशी असेल समितीची जबाबदारी:
राज्य अभ्यासक्रम आराखडा निर्मितीसाठी शिफारशी करणे
केंद्रीय शिक्षण मंत्रालय आणि एनसीआरटीच्या मार्गदर्शक सूचनांनुसार संस्थांशी समन्वय साधने
समित्या आणि उपसमित्या तयार करून सदस्यांना मार्गदर्शन व शिफारशी करणे
राज्य अभ्यासक्रम आराखडा, मूल्यमापन निर्मितीसाठी तयार होणाऱ्या समित्या, उपसमित्यांना अंतिम मान्यता देणे
आराखड्याचे प्रारूप तपासून योग्य ते बदल करून सुसंगत आराखड्यास अंतिम रूप देणे


