आरोग्य क्षेत्रात सेवाभावी वृत्ती जपणारे डॉ. जफरुल्ला चौधरी यांचे वयाच्या 82 व्या वर्षी मूत्रपिंड आणि यकृताच्या आजाराने निधन झाले.
अल्पपरीचय:
जन्म : 27 डिसेंबर 1941 , कोलकाता
1964 या वर्षी वैद्यकीय शिक्षण ढाका वैद्यकीय महाविद्यालयातून घेतले.
महाविद्यालयीन जीवनात त्यांच्यावर डाव्या राजकीय विचारसरणीचा प्रभाव होता.
वैद्यकीय पदव्युत्तर शिक्षणासाठी त्यांनी इंग्लंड गाठले. 1965 ते 1971 पर्यंत त्यांनी लंडनमध्ये व्हास्कुलर सर्जन म्हणून प्रशिक्षण घेतले मात्र अंतिम परीक्षा न देताच बांगलादेश मुक्तिसंग्रामत सहभागासाठी ते मायदेशी परतले .
मुक्ती लढ्यातील जखमी निर्वासितांवर उपचारासाठी त्यांनी पाच डॉक्टर, वैद्यकीय विद्यार्थी आणि काही महिला स्वयंसेवकांच्या मदतीने 480 घाटांचे पहिले खुले रुग्णालय त्रिपुरातील मेलाघर येथे सुरू केले.
बांगलादेशच्या निर्मितीनंतर हे खुले रुग्णालय ढाका येथे गोनोशास्त्स्थ केंद्र या नावाने सुरू झाले .
अल्प दरात दर्जेदार वैद्यकीय उपचार करणे हे संस्थेचे प्रमुख उद्दिष्ट होते त्याच वर्षी संस्थेने गरिबांसाठी आरोग्य विमा योजना सुरू केली.
चौधरी यांना बांगलादेश राष्ट्रीय औषध धोरणाचे जनक मानले जाते त्यांनी 1982 मध्ये तयार केलेल्या धोरणाच्या आधारावर देशाचे आरोग्य व्यवस्थेचा इमला उभा आहे
गरिबांच्या आरोग्यविषयक गरजांच्या आधारे तयार केलेले हे आशियातील पहिले समग्र औषध धोरण मानले जाते .
विविध पुरस्काराने सन्मानित:
रॅमन मॅगसेसे पुरस्कार (1985)
राईट लाईव्हलिहूड पुरस्कार (1992)
बांगलादेशचा सर्वोच्च नागरी पुरस्कार शॉधिनोता (स्वाधिनता) ने सन्मानित (1977)