Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

निधन : प्रकाशसिंग बादल (1927 – 2023)

शिरोमणी अकाली दलाचे नेते आणि पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांचे वयाच्या 95 व्या वर्षी निधन झाले
अल्पचरित्र

● जन्म : 8 डिसेंबर 1927, अबुल खुराणा (जि. मुक्तसर), पंजाब
● 1947 मध्ये वयाच्या 20 व्या वर्षी बादल यांनी राजकारणात प्रवेश केला.
● त्यांच्या राजकीय कारकीर्दीला सरपंच पदापासून सुरुवात झाली
● 1957 मध्ये ते पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले.
पाच वेळा पंजाबचे मुख्यमंत्री ते देशाचे कृषिमंत्री

● सन 1970 – 71, 1977 – 80, 1997 – 2002, 2007 – 2012, 2012 – 2017 या काळात त्यांना एकूण पाच वेळा पंजाबचे मुख्यमंत्री होण्याचा मान मिळाला
● ते पंजाबचे वयाने सर्वात तरुण मुख्यमंत्री होते (वयाच्या 42 व्या वर्षी मुख्यमंत्री होण्याचा बहुमान)
● 1972, 1980 , 2002 मध्ये बादल विरोधी पक्षनेते होते
● सन 1977 या वर्षी बादल मोररारजी देसाई मंत्रिमंडळात कृषिमंत्रीहोते.
● मागच्या वर्षी (2022) वयाच्या 94 व्या वर्षी पंजाब विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात लांबी मतदारसंघातून उतरलेले प्रकाश सिंग बादल हे देशातील सर्वात वयोवृद्ध उमेदवार ठरले होते. आम आदमी पक्षाचे गुरमितसिंग खुद्दीया यांनी बादल यांचा पराभव केला
पुरस्कार परत केला

● प्रकाशसिंग बादल यांना 2015 या वर्षी पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. मात्र, कृषी कायद्याविरोधातील आंदोलनावेळी त्यांनी तो परत केला.
निधन : 25 एप्रिल 2023, मोहाली , पंजाब

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *