अनुपचंद्र पांडे यांचा निवडणूक आयुक्त म्हणून कार्यकाळ 14 फेब्रुवारी रोजी संपला. यामुळे तीन सदस्यीय निवडणूक आयोगात एक पद रिक्त झाले आहे. केंद्र सरकार तसेच उत्तर प्रदेश सरकारमध्ये जवळपास 37 वर्षांच्या कारकिर्दीनंतर पांडे जून 2021 मध्ये आयोगात सामील झाले होते.
सध्या राजीवकुमार मुख्य निवडणूक आयुक्त असून, अरुण गोयल निवडणूक आयुक्त आहेत.