Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

निवृत्त सनदी अधिकारी मुकेश खुल्लर यांचे निधन Retired civil servant Mukesh Khullar passes away

Retired civil servant Mukesh Khullar passes away

● निवृत्त सनदी अधिकारी आणि राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निधी वाटपाचे सूत्र ठरविण्यासाठी नेमलेल्या सहाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष मुकेश खुल्लर यांचे वयाच्या 65 व्या वर्षी आकस्मिक निधन झाले.
● मूळचे दिल्लीचे असलेल्या खुल्लर यांनी १९८५ मध्ये भारतीय प्रशासन सेवेत निवड झाल्यानंतर
● भंडारा येथून सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून प्रशासकीय सेवेला प्रारंभ केला.
● शांत, संयमी स्वभाव, सामान्य लोकांशी संवाद साधून विषयाच्या मुळाशी जाऊन प्रश्नांची सोडवणूक करण्यात त्यांची हातोटी होती.
● आपल्या ३२ वर्षांच्या प्रशासकीय सेवेत खुल्लर यांनी नागपूर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, ठाणे जिल्हाधिकारी, नवी मुंबई महापालिका आयुक्त, माहिती तंत्रज्ञान, कृषी, आदिवासी विकास, ऊर्जा, सामान्य प्रशासन आदी विभागांचे प्रमुख म्हणून आपल्या कामाचा ठसा उमटवला होता.
● ठाण्याचे जिल्हाधिकारी असताना राज्यातील पहिले नागरी सुविधा केंद्र अर्थात सेतू केंद्राची खुल्लर यांची कल्पना पुढे राज्यात ‘सेतू सुविधा केंद्र’ म्हणून खूप गाजली.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *