●’नासा’ आणि ‘इस्रो’चा निसार हा संयुक्त उपग्रह 30 जुलै रोजी संध्याकाळी 5.40 वाजता श्रीहरिकोटामधील सतीश धवन अंतराळ केंद्रातून प्रक्षेपित केला जाणार आहे.
● ‘निसार’ उपग्रह पृथ्वीच्या २४२ किलोमीटर रुंदीच्या पट्ट्यात महत्त्वाची निरीक्षणे नोंदवेल.
● पृथ्वीच्या पृष्ठभागावरील अगदी किरकोळ बदल, भूपृष्ठातील बदल, वनस्पतींमधील बदल आदी नोंदी हा उपग्रह ठेवणार आहे.
● समुद्रातील बर्फाचे वर्गीकरण, किनारपट्टी निरीक्षण, वादळांचे स्वरूप, मातीच्या आर्द्रतेतील बदल, पृष्ठभागावरील जलस्रोतांचे निरीक्षण आणि आपत्ती व्यवस्थापनासाठी प्रतिसाद आदी बदलांचे निरीक्षणही या उपग्रहाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.