Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

नीती आयोगातर्फे जागतिक अर्थव्यवस्थेसाठीच्या हरित आणि शाश्वत विकास कार्यक्रमावर आधारित जी-20 परिषदेचे आयोजन

  • Home
  • Current Affairs
  • नीती आयोगातर्फे जागतिक अर्थव्यवस्थेसाठीच्या हरित आणि शाश्वत विकास कार्यक्रमावर आधारित जी-20 परिषदेचे आयोजन

नवी दिल्ली येथे 28 आणि 29 जुलै 2023 या दिवशी ही दोन दिवसीय परिषद होत आहे.

नीती आयोग, या भारत सरकारच्या धोरण नियोजन विषयक संस्थेने, ओटावा येथील आंतरराष्ट्रीय विकास संशोधन केंद्र आणि नवी दिल्ली येथील जागतिक विकास नेटवर्क (जीडीएन) यांच्या संयुक्त सहकार्याने आंतरराष्ट्रीय धोरणविषयक दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन केले आहे.

जागतिक पातळीवरील हरित आणि शाश्वत विकासविषयक शक्यता आणि आव्हाने यांचे परीक्षण करण्यासाठी आयोजित केलेल्या या कार्यक्रमात सुमारे 40 अग्रणी विचारवंत सहभागी होणार आहेत. या कार्यशाळेच्या पहिल्या दिवशी, उर्जा, हवामान आणि विकास, तंत्रज्ञान, धोरणे आणि नोकऱ्या आणि शाश्वत विकासासाठी जागतिक वित्तपुरवठ्याला नव्याने आकार देणे या संकल्पनांवर अधिक लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. तर दुसऱ्या दिवशी बहुपक्षीयता,तसेच अनिश्चित जगातील तडजोडी,लवचिकता आणि समावेशन यांच्याशी संबंधित संकल्पनांवर चर्चा करण्यात येईल.

नीती आयोग आणि त्यांचे भागीदार या कार्यशाळेतून हाती आलेल्या निष्कर्षांचा विविध मंचाच्या माध्यमातून पाठपुरावा करतील. सदर धोरणविषयक कार्यशाळेच्या सुरवातीला नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी.व्ही.आर.सुब्रमण्यम् उपस्थितांना संबोधित करतील, तर जी-20 साठीचे भारताचे शेर्पा अमिताभ कांत आणि नीती आयोगाचे उपाध्यक्ष सुमन बेरी या कार्यशाळेची उद्दिष्ट्ये आणि प्रक्रिया याबाबत सविस्तर माहिती देतील.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *