- केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी 30 जुलै रोजी नवी दिल्ली येथे राष्ट्रीय शिकाऊ आणि प्रशिक्षण योजनेच्या (नॅटस – NATS :National Apprenticeship and Training Scheme 2.0) पोर्टलचे उद्घाटन केले आणि डीबीटी अर्थात थेट लाभ हस्तांतरण पद्धतीद्वारे शिकाऊ उमेदवारांना 100 कोटी रुपयांची छात्रवृत्ती दिली.
- हे प्रशिक्षणार्थी माहिती तंत्रज्ञान/आयटीईएस (माहिती तंत्रज्ञान सक्षम सेवा), उत्पादन, वाहन अशा विविध क्षेत्रांमध्ये प्रशिक्षण घेत आहेत.
- हा उपक्रम युवकांच्या कौशल्य आणि रोजगारक्षमतेवर लक्ष केंद्रीत करतो.
- या पोर्टलवर मोठ्या संख्येने शिकाऊ उमेदवार नोंदणी अर्ज करतील अशी अपेक्षा आहे.
- याव्यतिरिक्त आस्थापना/उद्योगातील रिक्त जागा आणि करारांच्या व्यवस्थापनासाठी पोर्टल उपयुक्त आहे.
- पदवी आणि पदविकाधारकांना रोजगार कौशल्ये विकसित करण्यासाठी या पोर्टलची मदत होईल.
- लोकशाही पद्धतीने शिकाऊ उमेदवारांमध्ये कौशल्ये विकसित करून त्यांच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आणि त्यांना भविष्यातील आव्हानांसाठी सज्ज करण्यासाठी नॅटस पोर्टल0 हा एक महत्त्वपूर्ण प्रयत्न आहे.
- या पोर्टलमुळे प्रशिक्षणार्थींना अधिकाधिक संधी उपलब्ध होतील आणि त्यांच्यात आणि रोजगार देण्याऱ्या कंपन्या यांच्यात समन्वय साधण्यासाठी मदत मिळेल.
- सर्व लाभार्थ्यांना स्टायपेंडमधील शासनाच्या हिश्याचे वितरण करण्यासाठी डीबीटी प्रणालीचा अधिकाधिक वापर करण्याचे या योजनेचे उद्दिष्ट आहे.