Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

न्यायदेवतेच्या हातात तलवारी ऐवजी संविधान

न्यायदेवतेच्या हातात तलवारी ऐवजी संविधान

शांघाय सहकार्य संघटना 2024

  • 2024 शांघायकोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) शिखर परिषद , ज्याला सरकारच्या प्रमुखांच्या परिषदेची 23 वी बैठक म्हणूनही ओळखले जाते, इस्लामाबाद , पाकिस्तान येथे 15 ते 16 ऑक्टोबर 2024 या कालावधीत आयोजित केले जात आहे.
  • भारतातर्फेया परिषदेत परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी प्रतिनिधित्व केले.

परिषदेतील ठळक मुद्दे

  • पररराष्ट्रमंत्रीएस. जयशंकर शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) बैठकीत सहभागी झाल्यानंतर त्यांनी पाकिस्तानला त्यांच्याच भूमीतून संदेश दिला आहे.
  • ‘सीमापारकारवाया दहशतवाद, फुटीरतावाद आणि उग्रवादाशी संबंधित असतील, तर व्यापार, ऊर्जा आणि दळवळण अशा क्षेत्रांत सहकार्य वाढण्याची शक्यता नाही,’ अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली.
  • एकपृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य, डिजिटल सर्वसमावेशन, मिशन लाइफ आणि संयुक्त राष्ट्रांची शाश्वत विकासाठी उद्दिष्ट साध्य करण्याच्या मुद्द्यांवर या देशांमध्ये सहमती झाली.
  • SCO Startup Forum, स्टार्टअप आणि पारंपारिक औषधांसाठी विशेष कार्यगट स्थापन करण्यावरही या देशांमध्ये सहमती झाली.

SCO

  • शांघायकोऑपरेशन ऑर्गनायझेशन ( SCO ) ही एक युरेशियन राजकीय , आर्थिक , आंतरराष्ट्रीय सुरक्षा आणि संरक्षण संस्था आहे जी 2001 मध्ये चीन आणि रशियाने स्थापन केली आहे. भौगोलिक व्याप्ती आणि लोकसंख्येच्या दृष्टीने ही जगातील सर्वात मोठी प्रादेशिक संस्था आहे , ज्याचा क्षेत्रफळ सुमारे 24% आहे.
  • ‘एससीओ’मध्येचीन, भारत, रशिया, पाकिस्तान, इराण, कझाकस्तान, किरगिस्तान, ताजिकिस्तान, उझबेकिस्तान आणि बेलारूस या देशांचा समावेश आहे. 16 देश निरीक्षक म्हणून आहेत.
  • 2025 यावर्षातील परिषद रशिया या देशात होणार आहे.

न्यायदेवतेच्या हातात तलवारी ऐवजी संविधान

  • सर्वोच्चन्यायालयात न्यायदेवेतच्या नव्या मूर्तीचे अनावरण झाले.
  • नव्यापुतळ्याच्या रचनेत आमूलाग्र बदल करण्यात आला असून न्यायदेवतेच्या डोळ्यांवरील पट्टी काढून तिचे डोळे उघडे ठेवण्यात आले आहेत.
  • तसेच, मूर्तीच्याएका हातात तराजू कायम ठेवला असला तरी दुसऱ्या हातातील तलवार काढून त्याऐवजी भारतीय संविधानाची प्रत ठेवण्यात आली आहे.
  • सरन्यायाधीशधनंजय चंद्रचूड यांच्या आदेशानुसार हा बदल करण्यात आला आहे.
  • मागीलकाही वर्षांपासून ब्रिटिशकालीन कायदे बदलण्याचे, त्यात सुधारणा करण्यास प्राधान्य देण्यात आले आहे.
  • वसाहतवादाचीअनेक प्रतीकेही बदलण्यात आली. त्याचाच एक भाग म्हणून भारतीय ‘दंड’ संहिता जाऊन ‘न्याय’ संहितेची देशात अंमलबजावणी सुरू झाली आहे.
  • याबदलामध्ये आता न्यायदेवतेच्या पुतळ्याचीही भर पडली आहे.
  • न्यायाधीशांच्यावाचनालयामध्ये नवी मूर्ती ठेवण्यात आली आहे.
  • न्यायदेवतेच्यापूर्वीच्या मूर्तीच्या डोळ्यांवर काळी पट्टी लावलेली होती. तिच्या डाव्या हातात तलवारही होती.
  • शिवाय, तिचेकपडे ग्रीक पद्धतीचे होते. नवी मूर्ती तयार करताना तिचे भारतीयीकरण करण्यात आले असून डोळे उघडे ठेवण्यात आले आहेत. तलवार जाऊन हातात ‘भारतीय संविधान’ आले आहे.
  • ग्रीकपद्धतीचे कपडे जाऊन त्याऐवजी न्यायदेवतेने साडी, अंगावर भारतीय पद्धतीचे दागिने आणि डोक्यावर मुकुट दाखविण्यात आला आहे.
  • भारतीयकायदा आंधळा नाही आणि तो शिक्षेला प्राधान्य देत नाही, असे न्यायदेवतेच्या मूर्तीमध्ये केलेल्या बदलातून सुचविले आहे.
  • तसेच, भारतीयन्याय सर्वांकडे समान नजरेने पाहतो, असे उघड्या डोळ्यांमधून सुचविले आहे; तर हिंसाचाराच्या नाही, तर देशातील कायद्यानुसारच न्यायदान केले जाईल हे संविधानातून सुचविले आहे.
  • डोळ्यांवरपट्टी आणि हातात तलवार असलेली न्यायदेवतेची मूर्ती ही ग्रीक कथांमधील ‘जस्टीलिया देवी’ची मूर्ती आहे.
  • रोमनसम्राट ऑगस्टस याने या मूर्तीचा वापर सुरू केला होता.
  • मूर्तीच्याडोळ्यांवरील पट्टीचा अर्थ, न्याय हा गरीब- श्रीमंत भेद न मानता समान असतो, असा सूचित केला जात होता.
  • न्यायहा अंतिम आणि वेगवान असतो हे दर्शविण्यासाठी मूर्तीच्या हातात तलवार होती.

ओमर अब्दुल्ला जम्मू काश्मीरचे नवे मुख्यमंत्री

  • नॅशनलकॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांनी जम्मू आणि काश्मीरच्या मुख्यमंत्रीपदाची  शपथ घेतली.
  • केंद्रशासितप्रदेशाचे ते पहिले मुख्यमंत्री आहेत.
  • 2019मध्येअनुच्छेद 370 हटविल्यानंतर  ही पहिलीच निवडणूक होती.
  • नायबराज्यपाल मनोज सिन्हा यांनी ओमर अब्दुल्ला व पाच मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.
  • जम्मूतीलसुरिंदर चौधरी हे उपमुख्यमंत्री असतील.
  • ओमरयांच्याकडे दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपद आले आहे.
  • यापूर्वीपूर्ण राज्य असताना 2009 ते 2014  या कालावधीत ते मुख्यमंत्री होते

जागतिक गरिबी निर्मूलन दिन

  • आंतरराष्ट्रीयगरीबी निर्मूलन दिन 2024 हा जागतिक गरीबी निर्मूलन दिन म्हणूनही ओळखला जातो .
  • दरवर्षी17 ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो .
  • हाएक जागतिक पाळणा आहे, जो गरिबीविरुद्धच्या लढ्याबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी आणि असुरक्षित समुदायांच्या उत्थानासाठी शाश्वत उपायांची गरज दू  करण्यासाठी साजरा केला जातो.
  • गरिबीहे केवळ आव्हानच नाही तर सामाजिक न्याय आणि विकास साधण्यातही अडथळा आहे.
  • हादिवस दारिद्र्यमुक्त जग मिळविण्यासाठी सामूहिक कृतीच्या महत्त्वाची आठवण करून देतो.
  • जागतिकगरिबी निर्मूलन दिनानिमित्त गरिबी निर्मूलन कार्यक्रम राबविण्यासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्याची मागणी केली जाते जेणेकरून प्त्ये कजण त्यांच्या मूलभूत मानवी हक्कांचा आनंद घेऊ शकेल
  • 1987 मध्येघोषणा, 1992 पासून साजरा करण्यात येऊ लागला

बँक ऑफ बडोदाच्या ब्रँड बँड अॅम्बेसेडर पदी सचिन तेंडुलकरची निवड

  • बँकऑफ बडोदाने दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरला आपला जागतिक बँड अॅम्बेसेडर म्हणून नियुक्त केले आहे.
  • सचिनतेंडुलकर आणि बँक ऑफ बडोदा यांच्यातील धोरणात्मक भागीदारी उत्कृष्टता आणि विश्वास यासारख्या मूलभूत मूल्यांवर आधार त आहे, असे बँकेने म्हटले आहे.
  • बँकऑफ बडोदा जास्तीत जास्त ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सचिन तेंडुलकरसह प्ले द मास्टरस्ट्रोक नावाने पहिली मोहीम सुरू करत आहे.
  • बँकेच्यासर्व ब्रँडिंग मोहिमा, ग्राहक शिक्षण आणि आर्थिक साक्षरता, फसवणूक प्रतिबंध जागरूकता कार्यक्रमांमध्ये सचिन तेंडुलकरचा सहभाग असेल.
  • आंतरराष्ट्रीयक्षेत्रातही बँक ऑफ बडोदा ब्रँडचा विस्तार होण्यासाठी सचिन तेंडुलकरच्या प्रसिद्धीचा लाभ होईल.
  • बँकेनेप्रीमियम सेवा इच्छिणाऱ्या ग्राहकांसाठी डिझाइन केलेले ‘बॉब मास्टरस्ट्रोक बचत खाते’ हे एक खास बचत खाते सुरू करण्याची घोषणा केली.
  • बँकेचेव्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी: देबदत्त चंद

 भारताच्या नीतू डेव्हिड यांचा ‘हॉल ऑफ फेममध्ये समावेश

  • भारतीयमहिला क्रिकेट संघाच्या माजी फिरकी गोलंदाज नीतू डेव्हिड यांना दक्षिण आफ्रिकेचा महान खेळाडू ए. बी. डिव्हिलियर्स व इंग्लंड संघाचा माजी कर्णधार अॅलिस्टर कूक हे खेळाडू असलेल्या पंक्तीत स्थान मिळाले आहे.
  • आयसीसीकडून’हॉल ऑफ फेम’ यादी जाहीर करण्यात आली.
  • यामध्येभारताच्या डेव्हिड यांच्यासह डिव्हिलियर्स व कूक यांचाही समावेश आहे.
  • प्रतिष्ठेच्यायादीत स्थान मिळवलेल्या डेव्हिड या भारताच्या दुसऱ्या क्रमांकाच्या महिला क्रिकेटपटू आहेत.
  • याआधीडायना एडुलजी यांना सन्मान मिळाला आहे.
  • नीतूडेव्हिड यांनी भारतासाठी 97 एकदिवसीय सामन्यांत व 10 कसोटी सामन्यात आपल्या खेळाची चमक दाखवली आहे.
  • एकदिवसीयक्रिकेट मध्ये 141 तर कसोटी क्रिकेट मध्ये 41 फलंदाज बाद करण्याची किमया नीतू डेव्हिड यांना करता आली आहे.
  • एकदिवसीयक्रिकेटमध्ये 100 फलंदाज बाद करणाऱ्या डेव्हिड या भारताच्या पहिल्याच महिला खेळाडू ठरल्या आहेत.
  • 2005 मधीलमहिलांचे एकदिवसीय विश्वचषकात सर्वाधिक फलंदाज बाद करताना डेव्हिड यांनी भारताला अंतिम फेरीत नेले होते.

जैवविघटनशील बायोप्लास्टिकची निर्मिती

  • प्राजइंडस्ट्रीजच्या वतीने बायोपॉलिमरसाठीची देशातील पहिली व एकमेव अशी प्रात्यक्षिक सुविधा सुरू करण्यात आली आहे.
  • यासुविधेमध्ये स्वदेशी आणि एकात्मिक तंत्रज्ञानाने विकसित करण्यात आलेल्या पॉलिलॅक्टिक अॅसिड तंत्रज्ञानाद्वारे जैवविघटनशील अशा बायोप्लॅस्टिकची निर्मिती करण्यात येणार असल्याची माहिती प्राज इंडस्ट्रीजचे अध्यक्ष डॉ. प्रमोद चौधरी यांनी दिली.
  • पुण्याजवळीलजेजुरीमध्ये  उभारण्यात आलेल्या या सुविधेचे उद्घाटन केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान खात्याचे राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांच्या हस्ते नुकतेच झाले.
  • याआत्याधुनिक प्रात्यक्षिक सुविधेमध्ये पॉली लॅक्टिक ऍसिड हा पहिलाच विभाग असून याशिवाय किण्वन रासायनिक संश्लेषण विलगीकरण आणि शुद्धीकरण यासारखे इतर सहाय्यक विभाग उभारण्यात आले आहेत.
  • एकूणतीन एकर परिसरात ही सुविधा असून यामध्ये वर्षाला 100 टन लॅक्टिक ऍसिड ,60 टन लॅक्टाईड आणि समतुल्य प्रमाणात 55 टन पॉली लॅक्टिक ऍसिड चे उत्पादन घेणे शक्य आहे.
  • जैवगतिशीलतेसोबतच जैवइंधन उद्योगात कंपनीने नेतृत्वही प्रस्थापित केले.
  • याकौशल्य व अनुभवाच्या जोरावर प्राजने आपल्या बायो-प्रिझम पोर्टफोलिओद्वारे रिन्युएबल केमिकल्स आणि मटेरिअल्समध्ये (आरसीएम) धोरणात्मकदृष्ट्या विविधता आणली, तेव्हापासून आजवर प्राजने आपल्या
  • प्राजमॅट्रिक्स संशोधन व विकास केंद्रात बायोप्लॅस्टिकला महत्त्व देत पॉलिलॅक्टिक अॅसिड (पीएलए) तंत्रज्ञान विकसित करण्यावर भर दिला.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *