पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 18 जानेवारी रोजी श्री राम जन्मभूमीशी संबंधित सहा विशेष टपाल तिकिटे जारी केली, त्याशिवाय, याआधी प्रभू रामाशी संबंधित घटनांबद्दल, जगातील इतर देशांनी जारी केलेल्या टपाल टिकीटांचा अल्बम (संग्रह) देखील त्यांनी जारी केला.
अधिक माहिती
● सूर्यवंशी’ श्रीरामाचे प्रतीक असलेला सूर्य,’शरयू’ नदी आणि मंदिराची अंतर्गत वास्तुरचनाही या टपाल टिकिटावर चित्रित करण्यात आली आहे. सूर्य देशात नव्या प्रकाशाचा संदेश देत आहे तर ,रामाच्या आशीर्वादाने देश सदैव चैतन्यदायी राहील हे शरयूचे चित्र सूचित करते.
● अमेरिका, ऑस्ट्रेलिया, कंबोडिया, कॅनडा, चेक प्रजासत्ताक, फिजी, इंडोनेशिया, श्रीलंका, न्यूझीलंड, थायलंड, गयाना, सिंगापूर यांसारखे देश अशा अनेक राष्ट्रांपैकी आहेत ज्यांनी भगवान रामाच्या जीवनातील घटनांवर आधारित टपाल तिकिटे मोठ्या आवडीने जारी केली आहेत.