पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ नायजर‘ पुरस्काराने गौरव
- पंतप्रधान नरेंद्र मोदी नायजेरिया दौऱ्यावर असून दौऱ्याच्या पहिल्या दिवशी त्यांच्या सन्मानार्थ नायजेरियाच्या स्टेट हाऊसमध्ये आयोजित समारंभात नायजेरियाचे राष्ट्रपती महामहिम बोला अहमद तिनुबू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना, त्यांच्या राजकीय कर्तृत्वाबद्दल तसेच भारत आणि नायजेरियातील संबंध वृद्धींगत करण्यासाठी दिलेल्या सर्वोत्कृष्ट योगदानाबद्दल ‘ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ नायजर’ हा नायजेरियाचा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करून गौरवण्यात आले.
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्त्वात भारताने जागतिक महासत्ता म्हणून स्वतःचे स्थान निर्माण केले आहे, त्याचवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परिवर्तनशील कारभारामुळे सर्वांसाठी एकता आणि शांतता प्रस्थापित केली आहे तसेच परस्पर सामायिक समृद्धी वाढली आहे, असे या पुरस्कारानिमित्त पंतप्रधानांना प्रदान केल्या केलेल्या मानपत्रात म्हटले आहे.
- 1969 नंतर नायजेरियाच्या या पुरस्काराने सन्मानित केले गेलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पहिले परदेशी नेते ठरले आहेत.
- मोदींना देशाकडून देण्यात आलेला हा 17 वा आंतरराष्ट्रीय पुरस्कार होता.
- क्वीन एलिझाबेथ या एकमेव परदेशी मान्यवर आहेत ज्यांना 1969 मध्ये हा पुरस्कार मिळाला होता.
- 17 वर्षात भारतीय पंतप्रधानांनी नायजेरियाला दिलेली ही पहिली भेट आहे.
व्हिक्टोरिया थेलविग ‘मिस युनिव्हर्स‘
- डेन्मार्कची व्हिक्टोरिया केजर थेलविग हिला 2024 चा ‘मिस युनिव्हर्स’ हा किताब मिळाला आहे.
- मेक्सिकोमध्ये पार पडलेल्या ‘मिस युनिव्हर्स’ स्पर्धेचे यंदा 73 वे वर्ष होते.
- हा किताब मिळवणारी व्हिक्टोरिया ही डेन्मार्कची पहिलीच विजेती ठरली आहे.
- मेक्सिको सिटी एरेनामध्ये या स्पर्धेचा अंतिम सोहळा पार पडला.
- ‘मिस नायजेरिया’ चिडिम्मा अॅडेत्शिना दुसऱ्या स्थानी तर मिस मेक्सिको’ मारिया फर्नांडा बेल्टरान तिसऱ्या स्थानी राहिली.
- मागील वर्षीची या किताबाची मानकरी निकाराग्वाची शेन्निस पालासियोस हिने व्हिक्टोरियाला मुकुट प्रदान केला.
- मिस युनिव्हर्स 2024’च्या स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व करणारी 18 वर्षांची सौंदर्यवती रिया सिंघा ने केले.
- 73 वी ‘मिस युनिव्हर्स’ स्पर्धा यंदा मेक्सिकोमध्ये आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत 125 देशातील स्पर्धकांनी भाग घेतला.
- आपल्या सौंदर्याने मिस युनिव्हर्सचा ताज जिंकणारी 21 वर्षीय व्हिक्टोरिया एक उद्योजिका आणि वकील आहे.
भारताने तीन वेळा मिस युनिव्हर्स चा किताब जिंकला
- याआधी तीन वेळा मिस युनिव्हर्सचा खिताब भारताच्या नावावर झाला आहे.
- 1994 मध्ये बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेननं भारतासाठी पहिल्यांदा हे विजेतेपद पटकावले होते. यानंतर लारा दत्ता(2000) आणि हरनाज संधू (2021)यांनीही हा खिताब पटकवला आहे.
मिस युनिव्हर्स स्पर्धा
- मिस युनिव्हर्स ही दरवर्षी घेतली जाणारी एक जागतिक सौंदर्य स्पर्धा आहे.
- सरासरी 60 कोटी दूरचित्रवाणी प्रेक्षक असलेली मिस युनिव्हर्स जगातील सर्वात लोकप्रिय सौंदर्य स्पर्धा मानली जाते.
- मिस युनिव्हर्स ऑर्गनायझेशन ही अमेरिकेच्या न्यू यॉर्क शहरात स्थित असलेली कंपनी ह्या स्पर्धेचे आयोजन करते.
- 1952 साली कॅलिफोर्नियाच्या लॉंग बीच शहरामध्ये ही सौंदर्य स्पर्धा सर्वप्रथम भरवली गेली. फिनलंडच्या आर्मि कुसुला यांनी ती जिंकली होती.
- आजवर सुष्मिता सेन (1994) , लारा दत्ता (2000) व हरनाज कौर संधू (2021) ह्या भारतीय सुंदरींनी ही स्पर्धा जिंकली आहे.
- अमेरिकेने 7 वेळा, व्हेनेझुएलाने 6 वेळा तर पोर्तो रिकोने 5 वेळा मिस युनिव्हर्स जिंकण्याचा बहुमान मिळवला आहे.
महाअन्नकूट उत्सव
- हैदराबादमधील सत्यम शिवम सुंदरम गो निवास येथे महाअन्नकुट उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला.
- या वेळी भाविकांनी गायींना चारा भरवला.
- अन्नकूट म्हणजे वास्तवात गोवर्धनाची पूजा होय. प्राचीन काळी हा उत्सव इंद्राप्रीत्यर्थ होत असे. पण वैष्णव संप्रदाय बलवान झाल्यावर इंद्रपूजेचे रूपांतर गोवर्धनपूजेत झाले.
- विविध प्रकारची पक्वान्ने आणि खाद्य पदार्थ तयार करून ते कृष्णाच्या मूर्तीच्या पुढे मांडणे व कृष्णाला त्याचा नैवेद्य दाखविणे याला अन्नकूट म्हणतात.



