गुजरात आणि कर्नाटक या राज्यांना मागे टाकत महाराष्ट्राने पुन्हा एकदा परदेशी गुंतवणूक खेचण्यात पहिला क्रमांक पटकावला आहे. 2022 – 23 या आर्थिक वर्षात 1 लाख 18 हजार 422 कोटी रुपयांची परकी गुंतवणूक करून महाराष्ट्र क्रमांक एकवर आला होता.
अधिक माहिती
• 2023 – 24 च्या पहिल्या तीमाहित (एप्रिल- जून) या कालावधीत 36 हजार 634 कोटी रुपये परकीय गुंतवणूक आली.
• आता 2023 – 24 च्या दुसऱ्या तीमाहित (जुलै ते सप्टेंबर 2023) आकडेवारी आली असून 28 हजार 868 कोटी रुपयांची परकीय गुंतवणूक आकर्षित करून पुन्हा महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आला आहे.
• एप्रिल ते सप्टेंबर 2023 या कालावधीत एकूण 65,502 कोटी रुपयांची परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात आली असून ती कर्नाटक, दिल्ली आणि गुजरात यांच्यातील एकत्रित गुंतवणूकीइतकी आहे.
• एप्रिल 2022 ते सप्टेंबर 2023 असा एकत्रित विचार केल्यास 1,83,924 कोटी रुपयांची परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात आली आहे.