- मत्स्योद्योग, पशुपालन आणि दुग्ध व्यवसाय मंत्रालयांतर्गत येणाऱ्या पशुपालन आणि दुग्ध व्यवसाय विभागाने राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना आगामी 21 व्या पाळीव पशुगणनेसाठी तयार करण्याच्या उद्देशाने एका महत्त्वपूर्ण कार्यशाळेचे आयोजन केले आहे.
- नवी दिल्लीतील विज्ञान भवनात 25 जून 2024 रोजी ही कार्यशाळा होणार आहे.
- कार्यशाळेचे प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय मत्स्योद्योग, पशुपालन आणि दुग्ध व्यवसाय मंत्री राजीव रंजन ऊर्फ लालन सिंह उपस्थित राहणार आहेत.
- राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना 21 व्या पाळीव पशुगणनेसाठी आवश्यक साहित्य म्हणजे मोबाईल अॅप व सॉफ्टवेअरसह उपकरणांचा योग्य वापर करण्यासाठी प्रशिक्षण देणे हा या कार्यशाळेचा मुख्य हेतू आहे.
- गणनेच्या प्रक्रियेत अचूक माहिती गोळा करण्यासाठी पद्धती आणि पाळीव जनावरांच्या नोंदणीकृत जातींची ओळख कार्यशाळेत सहभागींना करून दिली जाणार आहे.
- वर्ष 1919 मध्य पाळीव पशुगणनेला सुरुवात झाल्यापासून दर पाच वर्षांनी होणारी ही गणना पशुपालनाच्या क्षेत्रात धोरणांची निर्मिती आणि विविध योजनांनी अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने महत्त्वाची ठरत आली आहे.
- गणनेचा भाग म्हणून दारोदारी जाऊन केल्या जाणाऱ्या सर्वेक्षणामार्फत देशभरातील पाळीव पशुपक्ष्यांबाबत सविस्तर माहिती संकलित केली जाते.
- 21 वी पाळीव पशुगणना सप्टेंबर ते डिसेंबर 2024 या कालावधीत होणार असून या प्रक्रियेत मोबाईल व प्रसारण तंत्रज्ञानाचा वापर करून देशातील सर्व ग्रामीण व शहरी भागातील माहिती अचूक व परिणामकारकरित्या माहिती संकलन केले जाईल.