देशात प्रथमच जलशक्ती मंत्रालयाच्या वतीने जलगणना करण्यात आली
पहिल्या जलाशय गणनेमध्ये देशात सर्वाधिक जलसमृद्ध राज्य म्हणून पश्चिम बंगाल या राज्याची निवड करण्यात आली.
पश्चिम बंगाल बरोबरच उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश , ओडिशा आणि आसाम ही राज्य देखील पाण्याबाबत समृद्ध आहेत .
या पहिल्या जलगणनेमध्ये नैसर्गिक आणि मानवनिर्मित तळी, तलाव आणि इतर जलस्त्रोतांचा समावेश असलेली जलसंसाधने आणि जलस्त्रोतांच्या अतिक्रमणाबाबतची माहिती गोळा करण्यात आली आहे. त्यामध्ये ग्रामीण व शहरी दोन्ही भागातील जलस्त्रोत जलाशयांचा समावेश आहे .
वापरत असलेल्या आणि नसलेल्या अशा दोन्ही प्रकारच्या जलस्त्रोत जलाशयांची गणना केली गेली .
जलसिंचन, उद्योग ,मत्स्यपालन ,घरगुती/पिण्याचे पाणी ,मनोरंजनात्मक वापर ,धार्मिक भूजल पुनर्भरण या जलस्त्रोतांच्या सर्व प्रकारच्या वापराचाही या गणनेत विचार करण्यात आला आहे .
ही गणना यशस्वीरित्या पूर्ण झाली असून अखिल भारतीय आणि राज्यनिहाय अहवाल प्रकाशित करण्यात आले आहे.
सर्वाधिक जलसमृद्ध असलेली राज्ये:
1) पश्चिम बंगाल
2)उत्तर प्रदेश
3)आंध्र प्रदेश
4)ओडिशा
5)आसाम
शहरी भागात सर्वाधिक जलसाठे असणारी राज्ये:
1) पश्चिम बंगाल
2) तामिळनाडू
3) केरळ
4)उत्तर प्रदेश
5) त्रिपुरा
ग्रामीण भागात सर्वाधिक जलसाठे असणारी राज्ये:
1) पश्चिम बंगाल
2)उत्तर प्रदेश
3) आंध्र प्रदेश
4) ओडिशा
5) आसाम
महाराष्ट्रातील स्थिती:
पहिल्या जलगणनेत राज्यात 97,062 जलसंस्थांची नोंद
राज्यातील जलसाठ्यांपैकी 99.3% म्हणजे 96,343 साठे ग्रामीण भागात
शहरी भागात फक्त 0.7 % म्हणजे 719 साठे
बहुतेक जलसाठे म्हणजे जलसंवर्धन योजना
राज्यातील जलसाठ्यांपैकी 99.7% साठे सरकारी मालकीचे
देशातील जलसाठ्यांची संख्या:
गणना झालेले देशातील जलसाठे : 24,24,540
ग्रामीण भागातील एकूण जलसाठे : 23, 55,055
शहरी भागातील जलसाठे : 69,485
मानवनिर्मित जलसाठे : 78%
नैसर्गिक जलसाठे : 22 %