आंतरजातीय आणि आंतरधर्मीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना लग्नानंतर सुरुवातीच्या कालखंडात सुरक्षित निवारा देणारे राज्यातील पहिले मोफत ‘सेफ हाउस’ सातारा जिल्ह्यात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे सुरू करण्यात आले आहे. घरातल्या लोकांनी टोकाची भूमिका घेतल्यामुळे अनेक जोडप्यांना सुरुवातीच्या कालखंडात त्यांच्या गावी लगेच जाता येत नाही.
अधिक माहिती
● तसेच कुटुंबीय आणि समाजाकडून मारहाणीचा तसेच जिवाचादेखील धोका उद्भवू शकतो. अशा परिस्थितीत त्या जोडप्याला सुरक्षित निवारा देणाऱ्या केंद्राची गरज असते.
● पंजाब, हरियानामध्ये राज्य सरकारच्या मदतीने अशी ‘सेफ हाउस’ चालवली जातात.
● याच स्वरूपाचे पहिले ‘सेफ हाउस’ सातारा जिल्ह्यात सुरू करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र अंनिसमार्फत डॉ. हमीद दाभोलकर आणि शंकर कणसे यांनी दिली.
● महाराष्ट्र ‘अंनिस’चे कार्यकर्ते शंकर कणसे यांच्या जागेत त्यांनी स्वतःहून खर्च करून हा सुरक्षा निवारा बांधला आहे आणि महाराष्ट्र ‘अंनिस’ आणि ‘स्नेह आधार संस्थे’ मार्फत हा उपक्रम चालवला जाणार आहे.