पांबनचा नवा सेतू
- हिमालयाच्या दऱ्याखोऱ्यांत पुलांच्या उभारणीचे आव्हान पेलल्यानंतर, भारतीय रेल्वेने आता भर समुद्रात तामिळनाडू मधील पांबन येथे नवीन पूल यशस्वीपणे उभारला आहे.
- पुलाचा मध्यवर्ती भाग वर उचलून घेण्याची (व्हर्टिकल लिफ्ट) रचना असलेला हा रेल्वेपूल म्हणजे आधुनिक तंत्रज्ञान आणि प्रवासी सुरक्षेचा संगम असून, येत्या महिन्याभरात तो रेल्वे वाहतुकीसाठी खुला करण्याचे रेल्वेचे नियोजन आहे. त्यामुळे रामेश्वरम तीर्थक्षेत्राला भेट देणाऱ्या भाविकांसह स्थानिकांना दिलासा मिळणार आहे.
- तमिळनाडूतील मुख्य भूमी आणि रामेश्वरम बेटाला जोडणारा पांबन येथील ब्रिटिशकालीन रेल्वेपूल 111 वर्षे जुना आहे.
- या जुन्या पुलाशेजारीच नवा पूल उभारण्याचे नियोजन करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 2019 मध्ये नव्या पामबन पुलाची पायाभरणी करण्यात आली होती नवा पूल 10किलोमीटर लांबीचा असून यासाठी 535 कोटी रुपये खर्च आला आहे