पाकिस्तानातील खैबर पख्तुनख्वा प्रांतातील प्रांतिक निवडणुकीत डॉक्टर सविरा प्रकाश यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्या त्या पहिल्या हिंदू महिला ठरल्या आहेत.
अधिक माहिती
• पेशाने डॉक्टर असलेल्या सविरा प्रकाश यांनी पिके- 25 या जागेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला.
• खैबर पख्तुनख्वा मधील बुनेर जिल्ह्यात हा मतदारसंघ आहे .
• पाकिस्तान पीपल्स पार्टी कडून अर्ज दाखल केले.
• डॉक्टर सविरा प्रकाश यांनी अबोटाबाद इंटरनॅशनल मेडिकल कॉलेज मधून 2022 यावर्षी एमबीबीएस चे शिक्षण पूर्ण केले आहे.
• बुनेर येथील पाकिस्तान पीपल्स पार्टीच्या त्या महिला सरचिटणीस आहेत.