● आयएनएस गुलदार या नौदलातून सेवानिवृत्त झालेल्या युद्धनौकेवर पाण्याखालील संग्रहालय आणि जहाजाभोवती कृत्रिम प्रवाळ निर्माण करण्यात येणार आहे.
● सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले तालुक्यातील निवती रॉक जवळ हा प्रकल्प होणार असून याचा शुभारंभ दूरदृश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते करण्यात आला.
● भारतातील हा पहिलाच उपक्रम असून यामुळे सागरी संवर्धन व पर्यटनाला चालना मिळणार आहे.
● समुद्रात विराजमान होणाऱ्या जहाजाभोवती प्रवाळ निर्मिती होऊन त्याद्वारे स्कुबा डायव्हिंग व भविष्यात पाणबुडीद्वारे पर्यटन करता येणे शक्य होणार आहे.
● हा प्रकल्प उभारण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी व संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांच्या मान्यतेने भारतीय नौदलाने निवृत्त युद्धनौका महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळास विना मोबदला उपलब्ध करून दिली आहे.
● या जहाजाचे वजन १,१२० टन आहे. तर ८३.९ मीटर लांबी असून ९.७मीटर रुंदी आहे. ५.२ मीटर इतकी खोली आहे.



