Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

‘पिक्सेल स्पेस’ आणि ‘ध्रुव उपग्रह प्रक्षेपित ‘Pixel Space’ and ‘Dhruva Satellite Launched’

'Pixel Space' and 'Dhruva Satellite Launched'

● कॅलिफोर्नियातील ‘वँडेनबर्ग स्पेस फोर्स’ तळावरून बुधवारी ‘स्पेसएक्स’च्या फाल्कन-९ रॉकेटवरून ‘पिक्सेल स्पेस’ आणि ‘ध्रुव स्पेस’ या दोन स्टार्ट-अप्सनी यशस्वीरित्या उपग्रह प्रक्षेपित केले.
● ‘पिक्सेल’ने या वर्षी जानेवारीमध्ये तीन फायरफ्लाय उपग्रह प्रक्षेपित केले होते. पिक्सेलच्या उपग्रह प्रक्षेपणामुळे स्टार्ट-अपच्या सहा हायपरस्पेक्ट्रल उपग्रह संरचनेच्या पहिल्या टप्प्याची पूर्तता झाली असून, त्यामुळे पृथ्वीला जवळून आणि स्पष्टपणे पाहणे शक्य होणार आहे.
● ‘सर्व ३ फायरफ्लाय यशस्वीरित्या प्रक्षेपित झाले’, असे बंगळूरुस्थित पिक्सेल स्पेसचे संस्थापक आणि सीईओ अवैस अहमद यांनी म्हटले आहे.
● हैदराबादस्थित ध्रुव स्पेसद्वारे ऑस्ट्रेलियाच्या अकुला टेक आणि एस्पर सॅटेलाइट्सकडून अभिभार (पेलोड) घेऊन जाणारा त्यांचा पहिला व्यावसायिक ‘लीप-०१’ उपग्रहही प्रक्षेपित करण्यात येणार आहे.

सूक्ष्म निरीक्षण करता येणार

● लघुलहरी असलेल्या अवरक्त तरंगलांबीचा वापर करून भूनिरीक्षण करणाऱ्या हनी-बी उपग्रहांची मालिका अवकाशात सोडण्याच्या मोहिमेकडे ‘पिक्सेल’ने लक्ष केंद्रित केले आहे.
● “अनेक उपग्रह भूनिरीक्षण करत असले तरी, हनी-बीद्वारे विद्युत चुंबकीय स्पेक्ट्रमचा वापर होणार असल्याने उपग्रहांची विविध स्पेक्ट्रममधील माहिती गोळा करण्याची क्षमता वाढून मोठ्या क्षेत्राचे सूक्ष्म पद्धतीने निरीक्षण करता येणार आहे,” असे ‘पिक्सेल स्पेस’चे सहसंस्थापक क्षितिज खंडेलवाल यांनी सांगितले.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *