गुन्हेगारीकडे अल्पवयीन मुलांचा वाढता कल चिंतेचा विषय ठरत असतानाच गेल्या काही महिन्यांपासून गंभीर गुन्ह्यात अल्पवयीन मुले सामील असल्याचे लक्षात आल्यानंतर पुणे पोलिसांनी अल्पवयीन मुलांचे समुपदेशन करण्यासाठी ऑपरेशन परिवर्तन मोहीम हाती घेतली आहे.
गंभीर गुन्ह्यात सामील अल्पवयीन मुलांचे समुपदेशन करण्यात येत आहे .त्यासाठी पोलिसांकडून स्वयंसेवी संस्थांचे सहाय्य घेण्यात आले असून अल्पवयीन मुलांच्या वयोगटांनुसार समुपदेशन करण्यास सुरुवात झाली आहे .
समुपदेशानंतर काही अल्पवयीन मुले पुन्हा गुन्हेगारी कृत्य करत असल्याची दिसून आले त्यामुळे पोलिसांनी 16 ते 18 वयोगटातील मुलांवर कारवाई करण्यासाठी बाल गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्यातील तरतुदींचा आधार घेऊन कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.
पुणे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्या सूचनेनुसार शहरातील सर्व पोलीस ठाण्यात गुन्हेगारीकडे वळालेल्या अल्पवयीन मुलांचे समुपदेशन करण्यासाठी ‘ऑपरेशन परिवर्तन’ मोहीम हाती घेण्यात आली आहे.



