राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिन
- उर्जा कार्यक्षमता हा शाश्वत विकासात एक महत्वाचा पैलू आहे. देशात 14 डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिन म्हणून साजरा केला जातो.
- शाश्वत उर्जा पद्धतींचा अवलंब करण्याची गंभीर गरज अधोरेखित करत हा वार्षिक दिन आशेचा किरण आणि सामायिक जबाबदारी स्वीकारत साजरा केला जातो.
- केवळ औपचारिकपणे कार्यक्रम सादर न करता हा दिवस व्यक्ती, उद्योग आणि संस्थांना ऊर्जा कार्यक्षमतेचा स्वीकार करण्यासाठी एक प्रेरक शक्ती म्हणून चालना देतो.
- थीम: वर्ष 2024 च्या राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिनाची थीम ‘शाश्वत भविष्यासाठी मार्ग प्रकाशित करणे’ आहे.
पार्श्वभूमी
- हवामान बदलाचा सामना करण्यासाठी आणि भावी पिढ्यांसाठी ऊर्जा सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी शाश्वत ऊर्जा वापराच्या भूमिकेवर प्रकाश टाकण्यासाठी राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिवसाची स्थापना करण्यात आली.
- राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिन हा दिवस आपल्याला ऊर्जेचे संवर्धन करण्याची निकड असल्याची आठवण करून देतो.
- वर्ष 1991 पासून हा दिवस ऊर्जा कार्यक्षमता आणि संवर्धनासाठी देशाच्या वचनबद्धतेचे प्रतीक असलेल्या ऊर्जा कार्यक्षमता ब्युरो द्वारे हा दिवस साजरा करण्यात येतो.
- ऊर्जा संवर्धन, या विषयाला केंद्रस्थानी ठेवून कार्यक्षम पद्धती आणि तंत्रज्ञानाचा प्रचार करून अनावश्यक उर्जेचा वापर कमी करण्याच्या प्रयत्नांना चालना देणे, हे या दिवसाचे उद्दिष्ट आहे.
ख्यातनाम व्यंगचित्रकार मनोहर सप्रे यांचे निधन
- ख्यातनाम व्यंग्यचित्रकार, लेखक, विचारवंत, काष्ठशिल्पकार मनोहर सप्रे यांचे वयाच्या 92 व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांनी मृत्यूपूर्वी देहदानाचा संकल्प केला होता.
- सप्रे यांचा जन्म 4 जानेवारी 1933 रोजी बुलडाणा जिल्ह्यातील नांदुरा येथे एका सामान्य कुटुंबात झाला. त्यांनी अकोला येथील सीताबाई कला महाविद्यालयातून तत्त्वज्ञान विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले.
- समाजातील विसंगतीवर ते व्यंग्यचित्रातून प्रहार करायचे.
- व्यंग्यचित्रकार म्हणून ते देशभरात नावारूपास आले.
- 1952 ते 1964 अशी सलग बारा वर्षे मुद्रित माध्यमात त्यांची व्यंग्यचित्रे प्रकाशित झाली.याशिवाय ते उत्कृष्ट काष्ठशिल्पकार होते. त्यांनी अनेक पुस्तकांचे लेखनही केले होते.
- ‘मनोहारी’, ‘फरसाण’, ‘सांजी’ ‘व्यंगार्थी’, ‘दहिवर’, ‘होल्टा’, ‘बिल्लोरी’, ‘अलस-कलस’, ‘व्यंगविनोद’, ‘रुद्राक्षी’, ‘हसा की!’ आदी पुस्तके त्यांनी लिहिली. ‘सांजी’ हे पुस्तक म्हणजे कलावंतांना लिहिलेल्या पत्रांचा संग्रह आहे. ‘मनोहारी’ पुस्तकातून त्यांनी व्यंग्यचित्रकलेवर मार्मिक भाष्य केले आहे. अभ्यासपूर्ण विवेचन केले आहे. सुमारे पन्नास दशके त्यांचा या क्षेत्रात वावर राहिला.
पुणे येथे हायड्रो आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन
- पुणे जिल्ह्यातील खडकवासला येथील केंद्रीय जल आणि विद्युत संशोधन केंद्र (सीडब्ल्यू अँड पीआरएस) आणि इंडियन सोसायटी फॉर हायड्रॉलिक्स (आयएसएच) यांच्या वतीने ‘हायड्रॉलिक्स, वॉटर रिसोर्सेस, रिव्हर अँड कोस्टल इंजिनिअरिंग हायड्रो 2024 इंटरनॅशनल’ ही 29 वी आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली आहे.
- 18 ते 20 डिसेंबर या कालावधीत आयोजित या परिषदेत शाश्वत जल संसाधन व्यवस्थापन आणि जलविद्युत विकासासाठी उपाय यांवर मंथन केले जाणार आहे.
अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशा विरोधात महाभियोग
- विश्व हिंदू परिषदेच्या एका कार्यक्रमात वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायाधीश शेखर कुमार यादव यांच्या विरोधात विरोधी पक्षाच्या अनेक सदस्यांनी राज्यसभेत महाभियोग प्रस्ताव सादर केला आहे.
- यासंदर्भातील नोटिशीवर कपिल सिब्बल, पी. चिदम्बरम, विवेक तन्खा, दिग्विजय सिंह, जॉन ब्रिटास, मनोज कुमार झा आणि साकेत गोखले यांच्यासह 55 विरोधी पक्षाच्या खासदारांची स्वाक्षरी आहे.
- न्यायाधीश (चौकशी) कायदा, 1968 आणि घटनेच्या कलम 218 अंतर्गत ही नोटीस बजावण्यात आली आहे.
प्रधान सचिवपदी अश्विनी भिडे
- सनदी अधिकारी अश्विनी भिडे यांची मुख्यमंत्र्यांच्या प्रधान नियुक्ती करण्यात आली. भिडे सध्या मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालकपदी कार्यरत होत्या.
- सामान्य प्रशासन विभागाने भिडे यांच्या नियुक्तीचा आदेश जारी केला.
- फडणवीस यांनी मुख्यमंत्री कार्यालयात भिडे यांची नियुक्ती करून प्रशासनातील मोठ्या बदलाचे संकेत दिले आहेत.
- सध्या भारतीय पोलिस सेवेतील ब्रिजेश सिंह हे या पदावर कार्यरत होते.