Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

पुण्यात पहिले ‘कौशल्य विकास केंद्र’

पुण्यात पहिले 'कौशल्य विकास केंद्र'

आयएनएस अरिघात

  • विशाखापट्टणम येथे एका कार्यक्रमात देशाची दुसरी अणुशक्तीवर चालणारी बॅलिस्टिक क्षेपणास्त्र पाणबुडी  ‘आयएनएस अरिघात’ नौदलाच्या ताफ्यात सामील झाली आहे.
  • आयएनएस अरिघात कार्यान्वित झाल्यामुळे, भारताकडे आता दोन कार्यरत बॅलिस्टिक क्षेपणास्त्र पाणबुडया आहेत.
  • नौदलाच्या शस्त्रागारात आधीच आयएनएस अरिहंत आहे, जी ऑगस्ट 2016पासून कार्यान्वित आहे.

आयएनएस अरिघात

  • नवीन पाणबुडीला प्राचीन संस्कृत शब्द ‘अरिघात’ असे नाव देण्यात आले आहे; ज्याचा अर्थ ‘शत्रूंचा नाश करणारा’ असा होतो.
  • पाणबुडी आपल्या सागरी हितसंबंधांचे रक्षण करण्याच्या भारताच्या वचनबद्धतेचे प्रतीक आहे.
  • ही अरिहंतनंतरची दुसरी आण्विक पाणबुडी आहे.
  • विशाखापट्टणममधील शिप बिल्डिंग सेंटर (एसबीसी) येथे 2017 पासून या पाणबुडीचे बांधकाम सुरू होते.
  • आयएनएस अरिघात या पाणबुडीचे विस्थापन सहा हजार टन आहे आणि लांबी 113 मीटर आहे.
  • आयएनएस अरिघातच्या आत अणुभट्टी बसविण्यात आली आहे, ज्यामुळे या पाणबुडीला वेग मिळतो.
  • ही पाणबुडी पृष्ठभागावर जास्तीत जास्त 12-15नॉट्स (22-28किमी/तास) आणि पाण्याखाली गेल्यावर 24 नॉट्स (44 किमी/तास) वेग देऊ शकते.
  • अरिघातमध्ये दुहेरी हुल, बॅलास्ट टँक, दोन सहाय्यक इंजिन आणि आणीबाणीच्या परिस्थितीसाठी शक्ती आणि गतिशीलता नियंत्रणात आणण्यासाठी थ्रस्टरदेखील बसवण्यात आले आहे.
  • आयएनएस अरिहंतप्रमाणे यातदेखील 3,500 किलोमीटरपेक्षा जास्त अंतरापर्यंतची रेंज असलेले चार अणु-सक्षम एसएलबीएम (पाणबुडीने प्रक्षेपित बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे) किंवा 750 किलोमीटर अंतरापर्यंतची रेंज असणारे 12 के-15 एसएलबीएम वाहून नेण्याची क्षमता आहे.
  • याव्यतिरिक्त, आयएनएस अरिघात टॉर्पेडोनेदेखील (पाण्याखालील सिगारच्या आकाराचे रॉकेट) सज्ज असेल.
  • “आयएनएस अरिघात ही आयएनएस अरिहंतच्याच आकाराची, लांबीची आणि विस्थापनाची आहे.
  • या पाणबुडीत अधिक के-15 क्षेपणास्त्रे वाहून नेली जाऊ शकतात.
  • नवीन पाणबुडी अधिक सक्षम आहे.” बऱ्याच तज्ज्ञांनी नोंदवले आहे की, आयएनएस अरिघातला गेम चेंजर ठरवणारी गोष्ट म्हणजे त्याची गुप्त क्षमता. प्रगत सोनार प्रणाली आणि अत्याधुनिक स्टेल्थ तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेली आयएनएस अरिघात समुद्राच्या पृष्ठभागाखाली लपून, कोणत्याही धोक्याला जलद आणि निर्णायकपणे प्रतिसाद देण्यास सक्षम आहे
  • पाणबुडीविरोधी युद्धापासून ते गुप्तचर माहिती गोळा करणे आणि विशेष ऑपरेशन्सपर्यंत विविध मोहिमा राबविण्याची क्षमता आयएनएस अरिघातमध्ये आहे; ज्यामुळे प्रादेशिक स्थिरता आणि सुरक्षिततेला हातभार लागतो.

पुण्यात पहिले कौशल्य विकास केंद्र

  • जगभरातील विकसित देशांना सध्या कुशल मनुष्यबळाची कमतरता भासत आहे.
  • हे मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घेतला असून, या अंतर्गत राज्यातील राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळाचे (एनएसडीसी) पहिले ‘महाराष्ट्र कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र’ पुण्यात उभारण्यात आले आहे.
  • दहावी-बारावी झालेल्या विद्यार्थ्यांना ब्युटी अँड वेलनेस, हॉस्पिटॅलिटी, मशिन ऑपरेटर्स, हेल्थ केअर, परदेशी भाषा अशा विषयाचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण केंद्रात दिले जाणार आहे.
  • मॉडेल कॉलनीतील शासकीय दूरशिक्षण तंत्रनिकेतनच्या जागेत हे केंद्र  उभारण्यात आले आहे एनएसडीसी  तर्फे देशांतर्गत आणि जागतिक स्तरावर कुशल मनुष्यबळ निर्माण व्हावे यासाठी प्रशिक्षण दिले जाते. त्यानुसार राज्यातील पहिले प्रशिक्षण केंद्र पुणे या ठिकाणी उभारण्यात आले आहेत.
  • विविध देशांमध्ये आवश्यक असणाऱ्या कुशल मनुष्यबळा संदर्भातील मागणी एनएसडीसीकडे येते संबंधित देशाच्या मागणीनुसार एनएसडीसी प्रशिक्षण कार्यक्रम राबविते त्यात प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना संबंधित देशात नोकरी उपलब्ध करून दिली जाते.
  • या प्रकारे आतापर्यंत 60,000 विद्यार्थ्यांना नोकरी मिळाल्याची माहिती एनएसडीसी च्या वतीने सांगण्यात आले.
  • महाराष्ट्र कौशल्य विकास केंद्राचे उद्घाटन 31 ऑगस्ट रोजी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे

एअर मार्शल डेंझील किलोर यांचे निधन

  • भारत पाकिस्तान यांच्यातील 1965 च्या युद्धात महत्त्वाची भूमिका बजावणारे एअरमार्शल डेझींल किलोर यांचे वयाच्या 90 व्या वर्षी निधन झाले.
  • त्यांनी पाकिस्तानचे सेबर विमान पाडण्याची मोलाच्या कामगिरी बजावली होती .
  • 1965 च्या युद्धात वीर चक्र मिळवलेल्या किलोर यांचे गुरुग्राम येथे निधन झाले.
  • 1933 मध्ये डिसेंबर महिन्यात लखनऊ येथे त्यांचा जन्म झाला होता.
  • ते ट्रेव्हर किलोर हे फायटर पायलट बंधू म्हणून ओळखले जाऊ लागले.
  • ट्रेवर किलोर हे स्वतंत्र भारतातील एअर किल करणारे हवाई दलातील पहिले वैमानिक होते.
  • 1965 च्या युद्धात त्यांनीही सेबर विमान पाडले होते.
  • डेंझील किलोर यांनी 1971 मध्ये झालेल्या भारत-पाक युद्धातही शौर्य गाजवले.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *