- भारतीय अवकाश संशोधन संस्थेने 23 जून रोजी ‘पुष्पक’ या ‘रियूझेबल लाँच व्हेइकल’ अर्थात पुनर्वापरायोग्य यानाचे तिसरे यशस्वी ‘लँडिंग’ केले.
- 5 किलोमीटर चिनूक हॅलिकॉप्टरमधून प्रक्षेपण
- प्रतितास 320 किलोमीटर लैंडिंगवेळी यानाचा वेग
चाचणीचे ठिकाण
- 23 जून रोजी सकाळी10 मिनिटांनी कर्नाटकच्या चित्रदुर्ग येथील ‘एअरोनॉटिकल टेस्ट रेंज’ मध्ये ही चाचणी झाली.
- तिसऱ्या चाचणीवेळी हे यान उंचावरून सोडण्यात आले.त्या वेळी जोरदार वारे वाहत होते. तरीही हे यान पूर्ण अचूकतेने धावपट्टीवर सुरक्षितपणे उतरले.
असे उतरवले यान
- ‘लँडिंग’च्या वेळी व्यावसायिक विमानाचा वेग ताशी 260 किलोमीटर, तर लढाऊ विमानाचा वेग अंदाजे 280 किलोमीटर प्रतितास असतो.
- या ‘लँडिंग’च्या वेळी प्रथम ब्रेक पॅराशूटच्या मदतीने प्रक्षेपण वाहनाचा वेग ताशी 100 किलोमीटरपर्यंत कमी करण्यात आला.
- त्यानंतर ‘गिअर ब्रेक’च्या साह्याने हे छोटे यान धावपट्टीवर उतरवण्यात आले.
वैशिष्ट्ये:
- पुष्पक हे ‘रिंग रॉकेट’ अर्थात पंख असलेले यान आहे.
- अमेरिकेच्या ‘स्पेस शटल’च्या पार्श्वभूमीवर हे भारताचे यान असेल.
- उड्डाण घेतल्यानंतर रॉकेट त्याला ठरावीक उंचीवर घेऊन जाईल आणि कक्षेत सोडेल.
- हे यान पृथ्वीभोवती फिरेल. त्याच्या माध्यमातून ‘सॅटेलाइट’ प्रक्षेपित केलें जातील आणि नंतर ते विमानाप्रमाणे रन-वेवर उतरवले जाईल.
- सन 2016 मध्ये फक्त उड्डाणाची चाचणी घेण्यात आली होती. त्या वेळी हे समुद्रावर उतरले होते.
त्यानंतर गेल्या वर्षभरात या यानाच्या तीन चाचण्या झाल्या आहेत