● सर्वोच्च ख्रिस्ती धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे प्रदीर्घ आजाराने वयाच्या 88 व्या वर्षी निधन झाले.
● अत्यंत साधी राहणी, गरिबांचे कल्याण करण्यासाठी झटण्यासाठी प्रेरित करणारे, सुधारणावादी अशी पोप फ्रान्सिस यांची ओळख होती.
● दक्षिण अमेरिकेतून झालेले ते इतिहासातील पहिले पोप होत.
● अर्जेंटिनामधील ब्युनोस आयर्स येथे 17 डिसेंबर 1936 रोजी जन्म झालेल्या जॉर्ज मारियो बर्गोग्लिओ यांनी 13 मार्च 2013रोजी 266 वे पोप म्हणून सूत्रे हाती
घेतली.
● तेराव्या शतकातील सेंट फ्रान्सिस यांचे नाव घेतलेल्या पोप फ्रान्सिस यांना गेल्या 12 वर्षांमध्ये चर्चमध्ये अनेक सकारात्मक बदल घडवण्याचे श्रेय दिले जाते.
पहिले पोप:
● लॅटिन अमेरिकेतील पहिले पोप
● जेसुईट परंपरेतील पहिले पोप
● सेंट फ्रान्सिस ऑफ असिसी यांच्यानंतर फ्रान्सिस हे नाव धारण करणारे पहिले पोप
● इराकला भेट देणारे आणि शिया पंथांच्या धर्मगुरूंची भेट घेणारे पहिले पोप
पर्सन ऑफ द इअर
● 2013 मध्ये पोप फ्रान्सिस हे टाइम मासिकद्वारा ‘पर्सन ऑफ द इअर’ म्हणून घोषित होणारे पहिले पोप होते.
● त्यांची विनयशीलता, सामान्य लोकांविषयी आस्था, स्नेह, रुग्णांशी संवाद साधणे, सामाजिक न्यायासाठी लढणे यात त्यांचा सहभाग असल्याने ते लोकांचे पोप
म्हणून ओळखले जाऊ लागले.
● पोप फ्रान्सिस हे फुटबॉलचे चाहते होते आणि ते अर्जेटिनाच्या सॅन लॉरेना फुटबॉल क्लबचे समर्थक होते.