● पोलंडच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उजव्या गटाच्या कॅरोल नारॉकी यांनी बाजी मारली. अत्यंत चुरशीच्या झालेल्या लढतीत त्यांना 50.89 टक्के मते मिळाली.
● उदारमतवादी गटाचे रफाल झाकोव्स्की यांना 49.11 टक्के मते मिळाली.
● नारॉकी कॉन्झव्हेंटिव्ह पक्षाचे नेते आहेत
● नारॉकी हे मुष्टियोद्धा आणि इतिहासकार आहेत.
● लॉ अँड जस्टिस पार्टीने त्यांना नवी सुरुवात करून दिली.
● 2015 ते 2023 या काळात हा पक्ष पोलंडमध्ये सत्तेत होता.
● नारॉकी हे सध्याचे अध्यक्ष आंद्रेज डुडा यांची जागा घेतील, जे एक रूढीवादी नेते आहेत. नारॉकीच्या समर्थकांनी आणि अनुयायांनी त्यांचे वर्णन ‘पारंपारिक, देशभक्तीपर मूल्यांचे मूर्त स्वरूप’ असे केले आहे.