- सरकारने 10 मे 2023 रोजी सर्व अंगणवाडी कर्मचाऱ्यांची क्षमता आणि कौशल्य वाढवण्यासाठी पोषण भी पढाई भी (PBPB) हा उपक्रम सुरू केला आहे.
- जेणेकरून सर्व अंगणवाडी कर्मचारी या सहा वर्षांखालील मुलांची बालपणी घेण्याची काळजी आणि शिक्षण आणि तसेच पोषण सेवा पुरविण्यासाठी सक्षम होतील.
- याअंतर्गत जून, 2024 पर्यंत देशभरात एकूण 11,364 राज्यस्तरीय प्रमुख प्रशिक्षक (CDPO, पर्यवेक्षक आणि अतिरिक्त संसाधन व्यक्ती) आणि 1877 अंगणवाडी सेविकांना ‘पोषण भी पढाई भी’ अंतर्गत प्रशिक्षण देण्यात आले आहे.
- दिव्यांग मुलांसह 6 वर्षाखालील बालकांच्या सर्जनशील, सामाजिक, भावनिक आणि संज्ञानात्मक विकासाला चालना देण्यासाठी तसेच बालपणी घेण्याची काळजी आणि शिक्षण यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी – अंगणवाडी सेविकांना प्रशिक्षित करत आणि अंगणवाडी केंद्रांतून उच्च दर्जाच्या पायाभूत सुविधा, खेळाची उपकरणे पुरवून अंगणवाड्यांचे चांगल्या सुविधा असलेल्या शिक्षण केंद्रात रूपांतर करण्यासाठी,सक्षम अंगणवाडी आणि पोषण0 चा दुसरा टप्पा तसेच ‘पोषण भी पढाई भी’ हा उपक्रम 10 मे 2023 रोजी सुरू करण्यात आला.
- अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे सक्षमीकरण करण्यासाठी आणि दिव्यांग मुलांसह सर्व मुलांना चांगले शिक्षण मिळावे हे सुनिश्चित करण्यासाठी,महिला बालकल्याण मंत्रालयाने – “नवचेतना-जन्म झाल्यापासून तीन वर्षांपर्यंत विकासाला चालना देण्यासाठी राष्ट्रीय उपक्रम-2024(नॅशनल फ्रेमवर्क फॉर अर्ली चाइल्डहुड स्टिम्युलेशन फॉर चिल्ड्रन फॉर बर्थ टू थ्री इयर्स 2024”) आणि “आधारशिला- पोशन भी पढाई भी या कार्यक्रमांतर्गत तीन ते सहा वर्षे 2024 पर्यंतच्या मुलांसाठी बालपणी घेण्याची काळजी आणि शिक्षण यासाठी राष्ट्रीय अभ्यासक्रम,हे दोन अभ्यासक्रम विकसित केले आहेत.