प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचे निधन
- टाटाया नाममुद्रेच्या माध्यमातून भारतीय उद्योग जगताला आधुनिक युगात नेण्यासाठी झटणारे आणि या क्षेत्राचा ठसा आंतरराष्ट्रीय पटलावर उमटवणारे दृष्ट्ये उद्योगपती,दानवीर, टाटा उद्योग समूहाचे माजी अध्यक्ष रतन नवल टाटा यांचे वयाच्या 86 व्या वर्षी वृद्धपकाळाने निधन झाले.
अल्पपरीचय
- रतनटाटा यशस्वी उद्योगपती असण्याबरोबरच ते त्यांच्या परोपकार अन् दानधर्मासाठीही ओळखले जातात.
- रतनटाटा यांचा जन्म 28 डिसेंबर 1937 ला मुंबईत झाला.
- नवलटाटा आणि त्यांच्या पत्नी नवजबाई सेठ यांचे दत्तकपुत्र म्हणजे रतन टाटा. रतन लहान असतानाच त्यांचे आई- वडील विभक्त झाले. त्यानंतर त्यांचे संगोपन त्यांच्या आजी नवाजबाई टाटा यांनी केले.
- रतनटाटा यांनी त्यांचे सुरुवातीचे शिक्षण मुंबईतून घेतले. यानंतर त्यांनी बिशप कॉटन स्कूल, शिमला आणि रिव्हरडेल कंट्री स्कूल, न्यूयॉर्कमधून 1955 मध्ये डिप्लोमा केला.
‘टाटा स्टील‘मधून सुरुवात
- रतनटाटा यांनी सन 1961मध्ये टाटा समूहाची प्रसिद्ध कंपनी टाटा स्टीलमधून आपल्या करिअरची सुरुवात केली.
- यानंतरते 1975 मध्ये हार्वर्ड बिझनेस स्कूलमध्ये बिझनेस मॅनेजमेंट शिकण्यासाठी गेले.
- त्यांनीकॉर्नेल युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चरमधून पदवीही मिळवली.
- आर्थिकदृष्टिकोनातून 1991हे वर्ष भारतासाठी खूप महत्त्वाचे होते.
- देशातउदारीकरण आणि खासगीकरणाचे धोरण स्वीकारल्यानंतर रतन टाटा टाटा समूहाचे अध्यक्ष झाले.
- त्यांच्यानेतृत्वाखाली या समूहाने केवळ भारतातच नव्हे तर जगभरात आपली छाप सोडली.
- ते1990 ते 2012पर्यंत समूहाचे अध्यक्ष होते.
- ऑक्टोबर2016 ते फेब्रुवारी 2017पर्यंत त्यांनी हंगामी अध्यक्षपद भूषवले.
- रतनयांनी आपला वारसा एका नव्या उंचीवर नेऊन ठेवला. ‘एअर इंडिया’ ही त्यांनी आपल्या साम्राज्यात समावेश केला.
जागतिक ब्रँडवर ‘टाटां‘ची मोहोर
- सन2004 मध्ये त्यांनी ‘टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस’ (टीसीएस) सार्वजनिक करण्याचा निर्णय घेतला.
- यासहऑटोमोबाइल क्षेत्रात टाटाने अँग्लो-डच स्टील निर्माता ‘कोरस’, ब्रिटिश ऑटोमोबाइल कंपनी ‘जग्वार लैंड रोव्हर’ आणि ब्रिटिश चहा कंपनी ‘टेटली’ यांसारखे अनेक मोठे जागतिक ब्रँड विकत घेतले होते. यानंतर टाटा समूह जागतिक स्तरावर खूप मोठा ब्रँड बनला.
- सेवाकार्यातनेहमीच अग्रणी केवळ व्यवसायच नव्हे, तर रतन टाटा त्यांच्या परोपकारी कार्यासाठीही ओळखले जातात.
- रतनटाटा यांनी भारतीय विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी कॉर्नेल विद्यापीठाला एकूण 28 दशलक्ष डॉलर्सची देणगी दिली.
- यामुळेगरीब आणि मध्यमवर्गीय भारतीय विद्यार्थ्यांना मदत होते.
- याशिवायत्यांनी 2014 मध्ये ‘आयआयटी बॉम्बे’ला संशोधनाला चालना देण्यासाठी 95 कोटी रुपयांची देणगी दिली. याबरोबरच दर वर्षी ते आपल्या कमाईतील मोठा हिस्सा धर्मादाय कार्यात खर्च करीत असत.
पुरस्कार:
- पद्मभूषण(2000)
- महाराष्ट्रभूषण(2006)
- पद्मविभूषण(2008)
- आसामवैभव पुरस्कार(2021 मध्ये कर्करोगाची काळजी घेण्यासाठी त्यांच्या योगदानासाठी त्यांना आसाम वैभव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.)
- ऑर्डरऑफ ऑस्ट्रेलिया(2023)
- यापुरस्कारासह देशातील तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध पदक, मानद डॉक्टरेटसह त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.
प्रथिनांवरील संशोधन, तंत्र निर्मितीला रसायनशास्त्राची नोबेल
- प्रथिनांची(प्रोटिन) त्रिमितीय रचना उलगडणाऱ्या; तसेच नव्या प्रकारची प्रथिने विकसित करणाऱ्या संशोधनाला 2024 या वर्षातील रसायनशास्त्राचे नोबेल पारितोषिक जाहीर झाले आहे.
- अमेरिकेच्यावॉशिंग्टन विद्यापीठातील प्रा. डेव्हिड बेकर; तसेच लंडनमधील ‘गुगल डीपमाइंड’चे डेमिस हॅसाबीस व जॉन जंपर यांना हे पारितोषिक विभागून देण्यात येणार आहे.
- ‘रॉयलस्वीडिश अकॅडमी ऑफ सायन्सेस’ने या पुरस्कारांची घोषणा केली.
- आर्टिफिशिअलइंटेलिजन्सच्या उद्गात्यांना यंदाचे भौतिकशास्त्राचे नोबेल पारितोषिक जाहीर झाले होते. पाठोपाठ रसायनशास्त्राचे पारितोषिकही यंदा ‘एआय तंत्रज्ञाना’च्या वापराने केलेल्या संशोधनाला जाहीर झाले.
- लंडनमधीलगुगल डीपमाइंड या कंपनीच्या हॅसाबिस आणि जंपर या दोघा शास्त्रज्ञांनी विकसित केलेल्या अल्फा फोल्ड या यंत्रणेच्या स ह्याने 2020 मध्ये सर्वप्रथम 80% च्या अचूकतेने प्रथिनांच्या रचनेचा अंदाज बांधण्यात शास्त्रज्ञांना यश आले.
- सध्याजगभरात ज्ञात असलेल्या सुमारे 20 कोटी प्रथिनांची त्रिमितीय रचना या यंत्रणेच्या साह्याने शास्त्रज्ञाने उलघडली असून त्यांच्या साह्याने विविध प्रथिनांची नेमकी भूमिका समजावून घेणे शास्त्रज्ञांना शक्य झाले आहे. याबाबत संशोधन करण्यात आले.
प्रा. डेव्हिड बेकर
- वॉशिंग्टनयेथे ज्यू कुटुंबात जन्मलेले डेव्हिड यांनी हार्वर्ड विद्यापीठातून पदवीचे शिक्षण घेतले.
- 1989मध्येत्यांनी बायोकेमिस्ट्रीमध्ये कॅलिफोर्निया विद्यापीठातून पीएचडी पूर्ण केली.
- 1993 मध्येत्यांनी वॉशिंग्टन विद्यापीठात संशोधन आणि अध्यापनाला सुरुवात केली.
- प्रथिनांची रचना आणि कार्य समजून घेण्यासाठी; तसेच नवी प्रथिने तयार करण्यासाठी त्यांनी गणितीय प्रक्रिया विकसित केल्या.
- बेकरआणि त्यांच्या सहकाऱ्यांनी टॉप 7 हे पहिले कृत्रिम प्रथिन तयार केले.
- त्यांनीबायोकेमिस्ट्रीमधील अनेक कंपन्याही स्थापन केल्या.
जॉन जंपर
- 1985 मध्येअमेरिकेत जन्मलेल्या जॉन यांचे शिक्षण शिकागो विद्यापीठात झाले.
- 2017 मध्येत्यांनी तेथूनच पीएचडी मिळवली.
- त्यांच्या पीएचडीचा विषयही प्रथिनांची रचना अभ्यासण्यासाठी मशीन लर्निंगचा वापर करणे हा होता.
- जॉनडीपमाइंड कंपनीचे अमेरिकेतील संचालक आहेत.
डेमिस हॅसाबीस
- लंडनयेथे जन्मलेल्या डेमिस यांनी वयाच्या चौथ्या वर्षी बुद्धिबळ खेळायला सुरुवात केली.
- शालेय वयात त्यांनी बुद्धिबळाच्या बहुतेक सर्व स्पर्धा जिंकल्या होत्या.
- केम्ब्रिज विद्यापीठात प्रवेशासाठी वयाची अट पूर्ण होत नसल्याने एक वर्ष त्यांनी बुलफ्रॉग प्रॉडक्शनसोबत 1994 मध्ये वयाच्या 17 व्या वर्षी पहिला व्हिडीओ गेम तयार केला.
- 1998मध्येत्यांनी स्वतःच्या एलिक्सिर स्टुडिओची सुरुवात केली.
- 2010 मध्येडीपमाईंड या एआय कंपनीची स्थापना केली, जी पुढे गुगलने विकत घेतली.
- याच कंपनीच्या अल्फाफोल्ड यंत्रणेने प्रथिनांच्या रचनेचा अचूक अंदाज बांधला.
प्रसिद्ध मल्याळम अभिनेते टी.पी. माधवन यांचे निधन
- प्रसिद्धमल्याळम अभिनेते टी.पी. माधवन यांचे वयाच्या 88 व्या वर्षी निधन झाले .
- वयाच्याचाळिशीनंतर आपल्या चित्रपट कारकिर्दीला सुरुवात करणाऱ्या माधवन यांनी सहाशेहून अधिक मल्याळम चित्रपटांमध्ये काम क ले.
- ते मल्याळम चित्रपट कलाकारांची संघटना असलेल्या मल्याळम मूवी आर्टिस्ट असोसिएशनचे पहिले सरचिटणीस होते .
- 1975 मध्येअभिनेता मधू त्यांनी त्यांना पहिली संधी दिली तेथूनच खऱ्या अर्थाने त्यांचे चित्रपट सृष्टीत पदार्पण झाले.
- मुख्यमंत्रीपिनराई विजयन यांनी माधवन यांच्या निधनावर शोक व्यक्त केला.



