● चित्रपट सृष्टीतील नावाजलेले कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी कर्जत मधील चौक येथील त्यांच्या एनडी स्टुडिओमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे आढळून आले आहे.
● काही दशकांपासून कलाक्षेत्रात काम करणाऱ्या देसाई यांनी मराठी हिंदी चित्रपट सृष्टीत उत्तम काम केले आहे
जीवन परिचय”:-
● जन्म: 6 ऑगस्ट 1965, ठाणे
● चित्रपट क्षेत्रात पदार्पण होण्याआधी नितीन देसाई मुंबईतील सर जे. जे. आणि रहेजा या कलामहाविद्यालयातून प्रकाशचित्रणाचे प्रशिक्षण घेतले.
● 1987 पासून चि त्रपट कारकिर्दीला सुरवात झाली.
● नितीन चंद्रकांत देसाई यांनी संजय लीला भन्साळी, अशितोष गोवारीकर ,विधु विनोद चोप्रा, राजकुमार हिरानी, जब्बार पाटील ,रवी जाधव ,परेश मोकाशी यासारख्या दिग्दर्शक आणि निर्मात्यांसह तर शाहरुख खान ,आमिर खान ,सलमान खान, सुबोध भावे यांसारख्या लोकप्रिय अभिनेत्यांबरोबर काम केले होते.
● महाराष्ट्राच्या घराघरात पोहचलेली ‘राजा शिवछत्रपती’ या स्टार प्रवाह वाहिणीवरील मराठी मालिकेची निर्मिती देसाई यांनी केली होती.
● 2005 मध्ये कर्जत मध्ये 52 एकरच्या जागेवर एनडी स्टुडिओ उभारला होता.
● अनेक भव्य सेट त्यांनी त्या स्टुडिओत उभे केले.
● देसाई हे अचाट प्रतिभा असलेले कला दिग्दर्शक होते त्यांनी परिंदा, 1942 एक प्रेम कथा, अकेले हम अकेले तुम, मुन्नाभाई एमबीबीएस यांसारखे अनेक लोकप्रिय चित्रपटांमध्ये कला दिग्दर्शक म्हणून काम केले आहे.
● वन्स अपॉन टाईम इन मुंबई ,देवदास ,फॅशन, स्वदेश आणि लगान यासारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी प्रोडक्शन डिझायनर म्हणून काम केले होते.
● त्यांना हम दिल दे चुके सनम, लगान, देवदास आणि बाबासाहेब आंबेडकर या चित्रपटांसाठी चार वेळा कला दिग्दर्शनासाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला आहे.
● 1987 मध्ये गाजलेल्या ‘तमस’ या मालिकेपासून त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली तर’ भूकंप’ याद्वारे चित्रपट सृष्टीत पदार्पण केले.
● 2018 च्या प्रजासत्ताक दिनी दिल्लीत झालेल्या कार्यक्रमात महाराष्ट्राचे वैभव सांगणारा चित्ररथही त्यांनी बनविला होता.
● नितीन चंद्रकांत देसाई यांना ‘आधुनिक युगाचा विश्वकर्मा‘ ही उपाधी देखील मिळाली होती.


