अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पिंपरी-चिंचवड शाखेच्या वतीने देण्यात येणारा ‘आशा भोसले पुरस्कार’ या वर्षी प्रसिद्ध गायक शांतनू मुखर्जी ऊर्फ शान यांना जाहीर करण्यात आला आहे. 11 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5.30 वाजता चिंचवड येथील कामगार कल्याण मैदानावर हा पुरस्कार सोहळा पार पडेल, अशी माहिती नाट्य परिषदेच्या पिंपरी-चिंचवड शाखेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांनी दिली.
अधिक माहिती
● शान यांनी संगीत क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार देण्यात येणार आहे.
● एक लाख अकरा हजार रुपये रोख, शाल व सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
● राष्ट्रीय स्तरावर संगीत क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या गायक, संगीतकार यांना नाट्यपरिषदेच्या पिंपरी- चिंचवड शाखेच्या वतीने दरवर्षी हा पुरस्कार देण्यात येतो.