Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

प्रसिद्ध शास्त्रीय गायक पं. प्रभाकर कारेकर यांचे निधन

 प्रसिद्ध शास्त्रीय गायक पं. प्रभाकर कारेकर यांचे निधन

 

  • प्रसिद्ध हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत गायक पंडित प्रभाकर जनार्दन कारेकर यांचे वयाच्या 80 व्या वर्षी निधन झाले.
  • उत्कृष्ट शास्त्रीय गायक, फ्युजन संगीतात वैशिष्ट्यपूर्ण काम, उत्कृष्ट शिक्षक अशी बहुआयामी प्रतिभा लाभलेले पंडित कारेकर गेली दोन वर्षे यकृताच्या आजाराने ग्रस्त होते.
  • 1944मध्ये गोव्यात म्हापसा येथील दैवज्ञ कुटुंबात पं. कारेकर यांचा जन्म झाला.
  • संगीताचा पिढीजात वारसा नसला तरी वडील जनार्दन कारेकर यांना संगीताची आवड होती.
  • एकदा शाळेच्या स्नेहसंमेलनासाठी त्यांनी पं. हळदणकर यांनी गायलेली दोन नाट्यपदे मोठ्या तयारीने गायली.
  • पु. ल. देशपांडे यांनी बसवलेल्या ‘शाकुंतल ते सौभद्र’ या कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी त्यांना मिळाली. स्वतः पुलंनी त्यांच्याकडून ‘प्रिये पाहा’ आणि ‘नच सुंदरी करू कोपा’ ही दोन नाट्यपदे बसवून घेतली.
  • ‘चंद्रिका ही जणू’, ‘राधाधरमधुमिलिंद जयजय’, ‘नभमेघांनि आक्रमिले’, ‘भालीं चंद्र असे धरिला’, ‘बहुत दिन नच भेटलो…’ अशा नाट्यपदांमधून आपल्या स्वरांची अनोखी झलक रसिकांच्या मनात कोरून ठेवले.

फ्युजनचा संगीतप्रवास

  • ऑर्नेट कोलेमन (अमेरिका) आणि सुलतान खान यांच्याबरोबर पं.कारेकर यांनी फ्युजन अल्बम केला तसेच त्यांच्यासह अन्य आंतरराष्ट्रीय वादक कलाकारांबरोबर देशोदेशी संगीताचे कार्यक्रम केले.
  • आपल्या तिन्ही गुरुं प्रति आदर म्हणून त्यांनी 2002 पासून दरवर्षी ‘स्वरांजली’ हा संगीत महोत्सव भरवण्यास सुरूवात केली.

विविध पुरस्कार

  • संगीत क्षेत्रातील योगदान आणि सेवेबद्दल त्यांना तानसेन सन्मान (2014), संगीत नाटक अकादमी (2016), लता मंगेशकर पुरस्कार, गोमान्त विभूषण पुरस्कार (2021) आदी पुरस्कारांनी नावाजण्यात आले .
  • शास्त्रीय संगीत हाच ध्यास आणि श्वास घेऊन जगलेल्या अग्रणी कलाकारांमध्ये पंडित कारेकर यांचे नाव आवर्जून घेतले जाते.

 

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *