- इराणमध्ये झालेल्या 54 व्या ‘इंटरनॅशनल फिजिक्स ऑलिम्पियाड’मध्ये भारतीय संघाने पाच पदके मिळवण्याची कामगिरी केली.
- भारतीय संघाला दोन सुवर्ण आणि तीन रौप्यपदके मिळाली असून, संघातील सर्व पाचही सदस्यांनी ही पदके पटकाविली.
- 21 ते 29 जुलै या कालावधीत इराणमधील इस्फाहान येथे ही स्पर्धा झाली.
- भारतीय संघातील छत्तीसगढ येथील रिदम केडिया आणि मध्य प्रदेशातील वेद लाहोटी यांनी सुवर्णपदक, तर नागपूर येथील आकर्ष राज सहाय, उत्तर प्रदेशातील भाव्या तिवारी, राजस्थानमधील जयविर सिंग यांनी रौप्यपदकाची कमाई केली.
- पदकनिहाय निकालात भारतीय संघ व्हिएतनामसह चौथ्या स्थानी राहिला.
- चीनने पहिले, रशियाने दुसरे,रोमानियाने तिसरे स्थान प्राप्त केले.
- स्पर्धेत एकूण 18 सुवर्ण, 25 रौप्य,53 कांस्य पदके देण्यात आली.
- 33 देशांतील एकूण 193 विद्यार्थ्यांचा स्पर्धेत सहभाग होता.
- हरितवायू उत्सर्जनामुळे होणारे परिणाम, पॉल ट्रॅपचा वापर करून आयन पकडणे, डॉप्लर कुलिंग टेक्नॉलॉजी, बायनरी स्टार सिस्टिम स्टॅबिलिटी असे स्पर्धेतील विषय होते.