पंतप्रधान नरेंद्र मोदी 14 जुलै रोजी फ्रान्सचे अध्यक्ष ईमेन्युअल मॅक्रोन यांच्यासह राष्ट्रीय दिनाच्या सोहळ्यानिमित्त आयोजित केलेल्या ‘बॅस्टील डे’ संचलनाला विशेष अतिथी म्हणून सहभागी झाले.
भारताच्या तिन्ही सशस्त्र दलांची पथके या संचलनात सहभागी झाली.
यावेळी भारतीय हवाई दलातील राफेल लढाऊ विमानानींनीही फ्रेंच लढाऊ विमानांसह या संचलनात हवाई सलामी दिली.
भारत आणि फ्रान्स धोरणात्मक भागीदारीची 25 वर्ष साजरी करत आहेत. पंचवीस वर्षांच्या भक्कम पायावर दोन्ही देश आगामी 25 वर्षांचा आराखडा तयार करीत आहेत.
फ्रान्सच्या सर्वोच्च पुरस्काराने नरेंद्र मोदी सन्मानित
फ्रान्सचा सर्वोच्च नागरी आणि लष्करी सन्मान ‘ग्रँड क्रॉस ऑफ द लिजन ऑफ ऑनर’ ने पंतप्रधान नरेंद्र मोदींना सन्मानित करण्यात आले.
हा मान मिळवणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पहिले भारतीय पंतप्रधान ठरले आहेत.
फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रोन यांनी त्यांना हा सन्मान प्रदान केला.
अध्यक्ष प्रसाद एलसी पॅलेस मध्ये मोदींना हा सन्मान प्रदान करण्यात आला.
दक्षिण आफ्रिकेचे माजी अध्यक्ष नेल्सन मंडेला, ब्रिटिश राजे चार्ल्स, जर्मनीच्या माजी चान्सलर एंजेला मार्केल ,संयुक्त राष्ट्रांचे माजी सरचिटणीस बुत्रोस घाली इत्यादी मान्यवरांना याआधी हा सन्मान प्रदान करण्यात आला आहे.
नरेंद्र मोदी हे फ्रान्सच्या राष्ट्रीय दिन ‘बॅस्टील डे’ च्या समारंभात अध्यक्ष मॅक्रॉंन यांच्यासोबत विशेष अतिथी म्हणून सहभागी झाले.



