टेनिस इतिहासातील सर्वकालीन सर्वोत्तम खेळाडू असा लौकिक मिळवण्याच्या दृष्टीने नोव्हाक जोकोविचने महत्त्वाचे पाऊल टाकले. जोकोविचने फ्रेंच ओपन स्पर्धेच्या अंतिम सामन्यात नॉर्वेच्या कस्पर रुडवर विजय मिळवताना कारकीर्दीतील विक्रमी 23 व्या ग्रँड स्लॅम विजेतेपदावर मोहर उमटवली. या कामगिरीसह त्याने पुरुषांमध्ये राफेल नदालचा (22) सर्वाधिक ग्रँड स्लॅम जेतेपदांचा विक्रम मोडीत काढला. तिसऱ्या मानांकित सर्बियाच्या जोकोविचने अंतिम सामन्यात कॅस्पर रुडवर 7-6,6-3,7-5 अशी मात करताना तिसऱ्यांदा फ्रेंच ओपन स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. याआधी 2016 आणि 2021 मध्ये फ्रेंच ओपन चे विजेतेपद मिळवले होते.
चार ग्रँडस्लॅम तीन वेळा जिंकणारा पहिलाच खेळाडू:
नोवाक जोकोविच याने आणखी एक विक्रम आपल्या नावे नोंदवला .ऑस्ट्रेलियन, फ्रेंच, विम्बल्डन व अमेरिकन या चार ग्रँडस्लॅमची किमान तीन विजेतेपद पटकावणारा तो पहिलाच टेनिसपटू ठरला आहे.
- ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा त्याने दहा वेळा जिंकली आहे .(2008, 2011, 2012,2013,2015,2016,2019,2020,2021,2023)
- फ्रेंच ओपन स्पर्धा तीन वेळा जिंकण्यात त्याला यश लाभले आहे (2016,2021,2023)
- विम्बल्डन स्पर्धेचे सात वेळा विजेतेपद(2011,2014,2015,2018,2019,2021,2022)
- तर अमेरिकन स्पर्धेचे तीन वेळा विजेतेपद पटकावले आहे(2011, 2015, 2018)
सर्वाधिक ग्रँड स्लॅम जिंकणारे टेनिसपटू:
1) नोव्हाक जोकोविच – 23
2) राफेल नदाल – 22
3) रॉजर फेडर – 20
4) पिट्स संप्रस – 14
फ्रेंच ओपन:
फ्रेंच ओपन ज्याला रोलँड-गॅरोस म्हणूनही ओळखले जाते . ही एक प्रमुख टेनिस स्पर्धा आहे जी फ्रान्सच्या पॅरिसमधील स्टेड रोलँड गॅरोस येथे दोन आठवड्यांपेक्षा जास्त कालावधीत सुरू झाली आहे. टूर्नामेंट आणि ठिकाणाची नावे फ्रेंच वैमानिक रोलँड गॅरोस याच्या नावावर आहे . फ्रेंच ओपन ही जगातील प्रमुख क्ले कोर्ट चॅम्पियनशिप आहे आणि सध्या या पृष्ठभागावर होणारी एकमेव ग्रँड स्लॅम स्पर्धा आहे. कालक्रमानुसार ही चार वार्षिक ग्रँड स्लॅम स्पर्धांपैकी दुसरी आहे.ऑस्ट्रेलियन ओपननंतर आणि विम्बल्डन आणि यूएस ओपनच्या आधी . 1975 पर्यंत, फ्रेंच ओपन ही एकमेव मोठी स्पर्धा होती जी गवतावर खेळली जात नव्हती . चॅम्पियनशिपसाठी आवश्यक असलेल्या सात फेऱ्या, मातीच्या पृष्ठभागाची वैशिष्ट्ये (मंद गती, उच्च बाउंस) आणि पुरुष एकेरीतील पाच सेटमधील सर्वोत्तम सामने, फ्रेंच ओपन ही जगातील सर्वात शारीरिकदृष्ट्या मागणी असलेली टेनिस स्पर्धा म्हणून ओळखली जाते.
सुरवात :- 1891
2023 ही एकूण 127 वी स्पर्धा होती.



