जोन हॉपफील्ड आणि जिओफ्री हिंटन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल
- भौतिकशास्त्रातीलसंकल्पनांचा वापर करून ‘मशीन लर्निंग’ क्षेत्राचा पाया रचल्याच्या कार्याची दखल घेत जोन हॉपफील्ड आणि जिओफ्री हिंटन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे.
- त्यांच्यायाच संशोधनामुळे कृत्रिम बुद्धिमत्तेचे (एआय) क्षेत्र विकसित होण्यास चालना मिळाली.
- हिंटनहे कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील पितामह म्हणून ओळखले जातात.
- दोन्हीसंशोधकांना 10 लाख डॉलर इतकी पुरस्कार रक्कम जाहीर झाली. पुरस्कारांचे वितरण 10 डिसेंबरला होणार आहे.
प्रा. जॉन हॉपफिल्ड
- शिकागोयेथे जन्मलेले जॉन यांचे वडील जॉन जोसेफ हॉपफिल्ड हेदेखील भौतिकशास्त्रज्ञ होते.
- सन1958मध्ये त्यांनी अल्बर्ट ओव्हरहाऊजर यांच्या मार्गदर्शनाखाली पीएचडी पूर्ण केली.
- बेललॅबोरेटरीमध्ये काही काळ संशोधन केल्यानंतर त्यांनी कॅलिफोर्निया विद्यापीठ, कॅलटेक आणि प्रिन्स्टन विद्यापीठात अध्यापन केले.
- भौतिकशास्त्रासोबतत्यांनी जैव भौतिकशास्त्रातही संशोधन केले.
- सन1982 मध्ये त्यांनी विकसित केलेल्या हॉपफिल्ड नेटवर्कची मेमरी मर्यादित होती.
- सन2016मध्ये त्यांनी ती अद्ययावत करून मॉडर्न हॉपफिल्ड नेटवर्क विकसित केले.
प्रा. जेफ्री हिंटन
- ब्रिटिश- नडियनसंगणक शास्त्रज्ञ असलेले हिंटन यांचा जन्म लंडन येथे झाला.
- नैसर्गिकविज्ञान, कलेचा इतिहास, तत्त्वज्ञान अशा विषयांचा अभ्यास करीत त्यांनी 1970 मध्ये प्रायोगिक मानसशास्त्रात पदवी मिळवली.
- सन1978मध्ये त्यांनी एडिंबरा विद्यापीठातून आर्टिफिशिअल इंटेलिजन्स या विषयात पीएचडी पूर्ण केली.
- अपुऱ्यानिधीमुळे पुढील संशोधनासाठी हिंटन अमेरिकेत गेले.
- 1985मध्येत्यांनी मशिन लर्निंगचे बोल्ट्झमन मशीन विकसित केले.
- सध्याते टोरोंटो विद्यापीठात प्राध्यापक आहेत.
जागतिक टपाल दिन
- जागतिकटपाल दिन 2024 ची थीम : “ संप्रेषण सक्षम करण्यासाठी आणि देशभरातील लोकांना सक्षम बनविण्याची 150 वर्षे ”.
इतिहास
- दरवर्षी9 ऑक्टोबरला ‘जागतिक टपाल दिन’ उत्साहात साजरा केला जातो. यामागचा उद्देश हा आहे की, टपाल सेवा आणि त्यातील विभागांविषयी लोकांना माहिती देणे, आणि विविध सेवांविषयी लोकांना जागरूक करणे होयं. या सर्व माहितीविषयी आणि सेवांविषयी लोकांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी, हा देखील या दिनामागचा हेतू आहे.
- 1874 मध्येस्वित्झरलॅंडची राजधानी असलेल्या ‘बर्न’ शहरामध्ये जगभरातील 22 देशांनी युनिव्हर्सल पोस्टल युनियन (युपीयू) ची उभारणी करण्यासाठी महत्वाच्या करारावर स्वाक्षरी केली होती.
- त्यानंतर, 1969मध्येआयोजित करण्यात आलेल्या एका खास संमेलनात जागतिक टपाल दिनाची घोषणा करण्यात आली होती.
- सर्वातप्रथम हा ‘जागतिक टपाल दिन’ जपानच्या टोकियोमध्ये 9 ऑक्टोबर 1969 मध्ये साजरा करण्यात आला होता.
- त्यानंतर, 9 ऑक्टोबरहा दिवस जागतिक टपाल दिन म्हणून जगभरात साजरा केला जातो.
- विशेषम्हणजे 1 जुलै 1876मध्ये आपला भारत देश सुद्धा ‘युनिव्हर्सल पोस्टल युनियन’ चा सदस्य झाला होता.
- हेसदस्यत्व मिळवणारा भारत हा पहिलाच आशियाई देश ठरला होता.
- त्यानंतर1 ऑक्टोबर 1854 मध्ये भारत सरकारने टपालसेवेसाठी एका विभागाची स्थापना केली होती.
‘बतुकम्मा‘ ला अमेरिकेत मान्यता
- तेलंगणमधीलप्रमुख उत्सवांपैकी एक बतुकम्मा साजरा करण्यास अमेरिकेतील चार राज्यांनी अधिकृत मान्यता दिली.
- नवरात्रातीलहा सण आता उत्तर कोरोलिना, जॉर्जिया, चार्लोट रॅले आणि व्हर्जिनिया मोठ्या प्रमाणात साजरा होणार आहे.
- अमेरिकेतीलया राज्यांच्या गव्हर्नरांनी बतुकम्मा साजरा करण्यासाठी अधिकृत परवानगी दिली.
- हासण अमेरिकेतील व्हाइट हाऊस, ऑस्ट्रेलियातील ऑपेरा हाऊस, लंडन ब्रिज आणि फ्रान्समधील आयफेल टॉवर येथे पूर्वीपासून साजरा करण्यात येत आहे.
- नवरात्रोत्सवसुरू असताना तेलंगणमध्ये वारसा सप्ताहाची घोषणा करण्यात आली आहे.
- बथुकम्माहा तेलंगणा आणि आंध्र प्रदेशच्या काही भागांतील महिलांद्वारे साजरा केला जाणारा हिंदू फूल-उत्सव आहे .
- दरवर्षीहा सण सत्यवाहन दिनदर्शिकेनुसार पितृ अमावस्येपासून नऊ दिवस साजरा केला जातो, जो सामान्यतः ग्रेगोरियन कॅलेंडरच्या सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यांशी जुळतो.
- बतुकम्मानऊ दिवस साजरी केली जाते आणि शरद नवरात्री आणि दुर्गा पूजा या सणांशी संबंधित आहे.
- तेलुगूमध्ये’बथुकम्मा’ म्हणजे ‘माता देवी जिवंत हो’.
- बथुकम्माचीव्यवस्था करण्यासाठी सहसा भाऊ त्यांच्या आई आणि बहिणींना फुले आणतात.
- ऐतिहासिकदृष्ट्या, बतुकम्माचाअर्थ “जीवनाचा उत्सव“असा होतो.ज्या दरम्यान तेलंगणातील स्त्रिया दागिने आणि इतर सामानांसह पारंपारिक साड्या परिधान करतात.