- साहित्य अकादमीच्या वतीने ज्येष्ठ साहित्यिक भारत सासणे यांच्या ‘समशेर आणि भूतबंगला‘ या कादंबरीला बालसाहित्याचा पुरस्कार जाहीर झाला असून शिवणकाम करीत लेखन करणारे तुळजापूर येथील देविदास सौदागर यांची ‘उसवण’ कादंबरी युवा पुरस्काराची मानकरी ठरली आहे.
- विविध भाषांतील बालसाहित्य तसेच युवा पुरस्कारांची घोषणा साहित्य अकादमीचे अध्यक्ष माधव कौशिक यांनी केली.
- प्रसिद्ध बालसाहित्यकार राजीव तांबे, विजय नगरकर आणि ‘साधना’चे संपादक विनोद शिरसाठ यांच्या परीक्षक समितीने बालसाहित्य पुरस्कारासाठी तर सरस्वती सन्मानप्राप्त ज्येष्ठ साहित्यिक डॉ. शरणकुमार लिंबाळे, किरण गुरव आणि श्रीकांत उमरीकर यांच्या परीक्षक समितीने मराठी भाषेतील युवा पुरस्काराच्या साहित्यकृतीची निवड केली.
- देशभरातील 23 साहित्यिकांना युवा पुरस्कार, तर 24 जणांना बालसाहित्य पुरस्कार जाहीर झाला. यामध्ये 10 कवितासंग्रहांचा समावेश आहे.