केंद्रीय पर्यावरण आणि वातावरण बदल मंत्रालयाने देशातील संरक्षित क्षेत्रांतील बिबट्यांच्या प्रगणनेचा अहवाल प्रकाशित केला. त्यात मध्य प्रदेशचा पहिला क्रमांक असून महाराष्ट्र दुसऱ्या, तर कर्नाटक तिसऱ्या स्थानावर आहे. देशातील संरक्षित वनक्षेत्रांमध्ये बिबट्यांची संख्या अंदाजे 13 हजार 874 असल्याचे जाहीर केले आहे. बिबट्यांच्या प्रगणनेचा पाचवा अहवाल प्रकाशित झाला.
अधिक माहिती
• हा अहवाल राष्ट्रीय व्याघ्र प्राधिकरण, भारतीय वन्यजीव संस्था यांनी देशातील विविध राज्यांच्या वन विभागांच्या मदतीने तयार केला आहे.
• त्यानुसार महाराष्ट्रातील संरक्षित वनक्षेत्रांमध्ये बिबट्यांची संख्या अंदाजे 1,985 असल्याचे सांगण्यात आले आहे.
• 2018 साली ही संख्या 1,690 क होती. या संख्येत 122 बिबट्यांची भर पडली आहे.
• राज्यातील संरक्षित क्षेत्रांमध्ये आढळणाऱ्या एकूण संख्येपैकी जवळपास 75 % संख्या ही संरक्षित वनक्षेत्राबाहेर राहत असल्याची महत्त्वपूर्ण नोंद अहवालात नमूद आहे.
• विदर्भातील पेंच, बोर, नवेगाव नागझिरा, मेळघाट आणि ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील बिबट्यांच्या अधिवासाची घनता 2018 च्या तुलनेत वाढली आहे.
• सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील बिबट्या अधिवासाच्या घनतेमध्ये वाढ झाल्याचेही अहवालात नमूद आहे.
राज्यनिहाय बिबट्यांची संख्या
• मध्य प्रदेश – 3,907
• महाराष्ट्र – 1,985
• कर्नाटक – 1,879
• तमिळनाडू – 1,070