भारत प्रथमच जागतिक कॉफी परिषदेचे यजमानपद भूषवणार आहे .
आंतरराष्ट्रीय कॉफी संघटनेतर्फे पाचवी परिषद 25 ते 28 सप्टेंबर दरम्यान बेंगळूरु येथे होणार आहे. कॉफीच्या व्यापाराला प्रोत्साहन कॉफी उत्पादक आणि कॉफी वापरकर्त्या देशांत सहकार्य वृद्धीसाठी आयसीओ ही आंतरशासकीय संस्था कार्यरत आहे . आयसीओ भारतीय कॉफी बोर्डाच्या सहकार्याने या परिषदेचे आयोजन करत आहे . कॉफी बोर्ड ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सचिव के.जी. जगदीशा हे आहेत. प्रसिद्ध टेनिसपटू रोहन बोपन्ना कार्यक्रमाचा ब्रँड अँबेसिडर असेल. आईओसी पाचव्यांदा जागतिक कॉफी परिषदेचे आयोजन करीत आहे. याआधी ब्रिटेन(2001), ब्राझील (2005), ग्वाटेमाला (2010) आणि इथियोपिया (2016) ने कॉफी परिषदेचे आयोजन केले आहे.


