Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

बेरेनबोईम आणि अव्वाद यांना इंदिरा गांधी पुरस्कार

  • Home
  • Current Affairs
  • December 2023
  • बेरेनबोईम आणि अव्वाद यांना इंदिरा गांधी पुरस्कार

शांतता, निशस्त्रीकरण आणि विकास यासाठी देण्यात येणारा इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय पुरस्कार यावर्षी डॅनियल बेरेनबोईम आणि अली अबू अव्वाद यांना संयुक्तपणे जाहीर करण्यात आला.

● 1986 पासून पुरस्काराला सुरवात झाली.
● या पुरस्कारार्थींनी संगीत संवाद व अहिंसक साधनांद्वारे इस्राईयली व पॅलेस्टिनी नागरिकांमध्ये सौहार्द वाढविण्यासाठी कार्य केले आहे.

उस्ताद डॅनियल बेरेनबॉईन
○ उस्ताद डॅनियल बेरेनबॉईन अर्जेंटिनामध्ये जन्मलेले शास्त्रीय पियानो वादक व संयोजक आहेत.
○ पश्चिम आशियामध्ये सुसंवाद वाढवण्यासाठी संगीताचा वापर करण्याच्या अथक प्रयत्नासाठी देखील ते ओळखले जातात.
○ बेरेनबोईन यांनी इस्राईल, पॅलेस्टाईन, अरब व उत्तर आफ्रिकन देशातील तरुणांमध्ये ऐक्य भावना निर्माण करण्यासाठी ‘वेस्ट- ईस्टर्न दिवाण आर्केस्ट्रा’ व बेरेनबोईम-साईड अकादमीची स्थापना केली.

अली अबू अव्वाद
○ अली अबू अव्वाद हे पॅलेस्टीनी शांतता कार्यकर्ते असून पॅलेस्टाईन व इस्राईल मध्ये सुरू असलेल्या संघर्षावर शांततेच्या मार्गाने तोडगा निघावा यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यांचा जन्म 1972 मध्ये झाला.
○ अव्वाद यांच्यावर महात्मा गांधी यांच्या विचारांचा पगडा आहे.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *